आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे

क्रांती कारक लहुजी साळवे
पेशवाईच्या कालखंडात इ .स.14 नोव्हेंबर 1794 मध्ये लहुजी साळवे यांचा जन्म झाला .साळवे घराणे शूर ,लढाई वृत्तीचे ,त्यानी लहान वयातच तलवा र ,कट्यार,खन्जर अशा हत्यारां सोबत खेळण्याची सवय लावली व पुढे ते त्यामध्ये निपून बनले.अस्पृश्यता ,जातीयता ,अंध श्रद्धा या महाराष्ट्रातील समस्यांचे चटके त्यांना बसू लागले.मनुवादी व्यवस्थे ने उभारलेली विषम जातियता किती दाहक होती.याची अनुभती आल्यानंतर मात्र महार,रामोशी,माळी ,आदिवासी,इ .मागास वर्गीय तरुणां साठी त्यानी गुप्तपणे तालिमखाना सुरु केला.ते आपल्या शिष्याना सशस्रा क्रांतीचे धडे देत समाजामध्ये दारिद्र्य,गुलाम,जुलुंम,शोषण करनार्यावर त्यांची नजर असायची शुद्राना धर्मानुसार शिक्षण घेण्याचा आधिकार नव्हता.उपभोग्य वस्तू म्हाणून शुद्रांकड़े,स्रि
यां कडे बघितले जायचे.या सर्व घट नां मधून मनामध्ये विद्रोह उत्पन्न होत होता ही व्यवस्था उलथुन टाकून निकोप समाज व्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय त्यानी निश्चीत केले आहे.
महात्मा फुल्यानी मुलींसाठी शाळा सुरु केली शिक्षणातून समाजाची उन्नती घडून येइल.असा ठाम विश्वास होता..लहुजी सालवेच्या क्रांति कारी विचारानी ज्योतिरावाच्या मनामध्ये ज्वाला नि र्माण झाली.महात्मा ज्योतीबा फुले वर सनातनी लोक हल्ला करु शकतात.यामुळे लहुजी सालवेनी महात्मा ज्योतिबाना शस्र विद्येचे शिक्षण दिले.सा वित्रि बाई ना सरक्षण देण्यासाठी आपल्या आखाड्या तील काही मंडळी उभी केली.मुन्शी बें न,फतिमा शेख,उस्मान भाई ,रानबा महार,गेणू मांग,इ .सहकर्यानी लहू जीँच्या मदतीने महात्मा फुले व सवित्रीबाईना सहकार्य केले.
महाराष्ट्रात पुण्यामध्ये गंज पेठेत साळवेंचा तालीम खाना आजही पहावयास मिळतो.1848 मध्ये मुक्ता साळवे या आपल्या पुतणी ला प्रवेश दिला.1855 मध्ये तिने बहुजनांच्या दु:खाला वाचा फोडली.आमचा धर्म कोणता?असा सवाल तिने केला.महाराष्ट्रा ला शैक्षणिक,धार्मिक,समाजीक व सांकृतीक स्तरावर खोलवर विचार करण्यास भाग पाडणारा हा प्रश्न खर्या सांकृ तिक परिवर्तनाचा पहिला प्रयत्न होय.मुक्ता सलवेचा निबंध आजही इंग्लंड मध्ये उपलब्ध आहे.पुण्याचा गेझेट मध्ये उपलब्ध आहे.महाराष्ट्राच्या इतिहा सात महापुरु षा च्या संघर्षाची गाथा सतत तेवत ठेवणे गरजेचे आहे.शालेय अभ्यास क्रमा त सामाजिक क्रान्तिमध्ये लहुजी साळवेन्च्या योगदाना बद्दल माहिती समाविष्ट करणे गतजेचे आहे.कारण लहुजी सा ळवे हे सामाजिक क्रांतिकारकांची मूळ प्रेरणा होय. लहुजी साळ वेंच्या य्योगदानाबाददल माहिती समाविष्ट करणे आज गरजेचे आहे.
लहुजी सालवेचे क्रांतिकारी आंदोलन पुढे फुले,शाहू,आबेड करानी चालविले म्हणून लहुजी साळवे हे बहुजनाच्या सामाजिक,सांस्कृतिक ,शैक्षणिक ,धार्मिक,क्रांतीचे आद्यशिल्पकार आहेत.सत्य शोधकी विचार त्यानी दिला मुक्त्ता साळ वें च्या रुपाने त्यानी आधुनिक भारतात पहिल्यांदा धर्म चिकित्सा करून सत्य शोधक संस्कृतिचा जन्म दिला.याच विचारातून म.फुले या ंचा सत्यशोधक चळवळ चालविली व समाजाला शो ष ण मुक्त करण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला.ज्या धर्माची आजही समाजाला गरज आहे.लहुजीनी महाराष्ट्रच्या सामाजिक,सांकृतीक परिघावर जे परिवर्तन घडून येत आहे.त्या परिवर्तनाचा आरंभ बिन्दू म्हणजे लहुजी साळवे होय.लहुजीनी हिमालयासारखे धैर्य उराशी बाळगून परिवर्तनाची ललकारी दिली. अशा प्रकारे लहुजी साळवे हे बहुजनांच्या सामाजिक क्रांतीचे मुख्य प्रवर्तक होय.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कै.प्रा.रामकृष्ण मोरे साहेब एक प्रेरणास्रोत

आज 8 नोव्हेंबर मा.प्रा.रामकृष्णजी मोरे साहेब यांची जयंती आहे मावळ , मुळशी ,खेड ,भोर या भागात विकासाची गंगा साहेबानी आणली त्यामुळे बहुजन समाजातील मुलांना नवीन शैक्षणिक दिशा प्राप्त झाली.जिल्हा शिक्षण मंड ळाला योग्य नेतृत्व मिळाले.बाबुरावजी घोलप साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ चित्रकला शिक्षकांचे पेंटींग प्रदर्शन असायचे साहेब स्वत: बोलावून्ं मार्गदर्शन करायचे प्रत्येक वर्षी साहेब राजकिय नेता व कलावंत याना निमंत्रण असायचं उदघाटनाला प्रतिष्ठित व्यक्ती असायचीच.पत्रकार परिषद घ्यायचे त्यामुळे प्रसिद्धी फार व्हायची .प्रत्येक कार्यक्रमाला साहेब स्वत:हजर असायचेच व सर्वांशी मन मोकळे पणाने बोलायचे त्यामुळे आम्हा कलाशिक्षकांना उर्जा मिळायची.ते विद्यार्थ्यां मध्ये मिसळायचे साहेब बोलायला लागले की ऐकत रहावसं वाटायच प्रत्येक विषयावर त्यांचा हातखंडा होता.साहेबांची विद्यालयाला भेट झाली की शाळा एकदम फ्रेश व्हायची ते शिक्षकांशी जास्त बोलायचे चर्चा करायचे त्यामुळे शिक्षकांना वेळेचे भान रहात नसायचे आस्थेने चौकशी करायचे त्यामुळे एक अतूट नाते तयार झाले होते.जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर कार्यक्रमात देहू याठिकाणी त्यानी मला फार मोठी जबाबदारी दिली होती.देहू गावाची सजावट स्वागताची ठिकाणे मुख्य कार्यक्रम याची जागा.प्रत्येक बाबीत बारिक लक्ष्य असे व मार्गदर्शन करित.श्री संत तुकाराम महाराजांचे चित्र कसे असावे याविषयी श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्राचा विचार मांडून गाथेवर नवीन प्रकारचे चित्र काढून घेतले.ह्या कार्यक्रमाला त्या काळात असामान्य जनसागर उसळला होता.प्रत्येक जण नेमून दिलेले कांम चोख बजावत होता त्याकार्यक्रमास मा.शरदचंद्रजी पवार साहेब येणार होते त्यामुळे तयारी जोरात होती.कार्यक्रम संपल्या नंतर ते स्वत:भेटून कौतुक करायचे पाठ थोपटायचे हे फार विशेष होते.नाव घेऊन अभिनंदन करायचे.अर्भकाचेसाठी या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आले होते त्याचे नियोजन व सजावट बालगंधर्व रंग मंदिरात झाला.तो एक अपूर्व सोहळा होता.असामान्य बुद्धिमत्ता सर्वसमावेशक वृत्ती साहेब मोठ्या प्रमाणेच सर्व सामान्यात खेळी मेळी ने वागायचे शिपाई असो की मुख्याध्यापक सर्वाना समजून घेणारे वेळ देणारे मोरे साहेब अचानक शाळेत आले तर प्रथम वर्गात जायचे मुलांना मार्गदर्शन करायचे .कार्यक्रमात प्रोत्साहन द्यायचे.थोड्या शब्दात मुलांची मन खेचून घ्यायचे.पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत प्राध्यापक ते अध्यक्ष असा अभिमानास्पद प्रवास . खेड मतदार संघाचे दहा वर्ष खासदार. पुणे स्थानिक स्वराज्यसंस्था मधुन विधान परिषदेवर आमदार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सांस्कृतिक क्रिडा व युवक कल्याण मंत्री.पिंपरी चिंचवड उद्योग नगरीचे शिल्पकार जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखाना व न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा अभ्यासू शिस्तप्रिय उत्तम वक्ता हजरजबाबीपणा उत्तम संसद पटु प्रशासनावर उत्तम पकड अफलातून पक्ष निष्ठा असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणजे च स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्णजी मोरे साहेब. पहिली पासून इंग्रजी सुरू करणारे मुलाच्या दाखल्यावर आईचे नाव असावे असा क्रांतीकारक निर्णय घेणारे साक्षरता ते संगणक नीती ते इंटरनेट या ब्रीदवाक्यानुसार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिष्यवृती परीक्षा साठी आग्रही असणारे कि ज्यामुळे गोर गरीब बहुजन समाजातील मुले सरकारी अधिकारी व्हावेत जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी व्हावेत इतर सर्वच क्षेत्रांत उच्च पदावर बहुजनसमाजातील मुले असावीत अशी भुमिका घेणारे म्हणजे स्वर्गीय मोरे साहेब. सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देणारे उत्तम संघटन कौशल्य असणारे गोरगरीब युवकांना नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय मोरे साहेब.कलाकारांची कदर करणारे जाणकार आ
आदर्श व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रिडा औद्योगिक वारकरी क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे जगदगुरू संतश्रेष्ठ संतशिरोमणी संत तुकाराममहाराजांचे वंशज असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सांस्कृतिक क्रिडा व युवककल्याण मंत्री स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्णजी मोरे साहेब यांच्या 72 जयंती निमीत्त एस.एम.जोशी सभागृहात श्री हरिभाऊ चिकने यानी रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान च्या माध्यमातून ह.भ.प.दिनकर भूकेले शास्री यांना जीवन गौरव पुरस्कार व ह.भ.प.उल्हास दादा पवार यांना कृतदज्ञता पुरस्कार .मा.डॉ.सदानंदजी मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला.त्या निमीत्त प्रा.रामकृष्णजी मोरे साहेब यांना विनम्र अभिवादन!!!