भीमरूपी महारुद्रा

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें |
सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, वंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||

॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा

विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा
शिवलीलामृत
अध्याय ४था
सूत म्हणाले . सज्जन हो ! किरात देशाचा राजा विमर्शन मोठा शिवभक्त असूनही मदिरा वं मदिराक्षी यांची आवड होती .एके दिवशी त्याची राणी किमुद्वाती हिने त्याला विचारले ,"नाथ ,शिवभक्त असूनही तुमच्या कडून दोष घडतात हे कसे ?"यावर राजा म्हणाला ,"प्रिये , पूर्वी मी पंपा नगरीत श्वान होतो .एका शिवरात्रीस मला उपवास व शिवालायाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करताच माझे प्राण गेले.त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे.." तेव्हा राणीने तिचा पूर्व जन्म विचारला असता तो म्हणाला ,"पूर्व जन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिरा भोवती तीन प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याणे मारले असता तू शिवमंदिरा समोरच प्राणत्याग केला . त्यामुळे आता तू राणी झाली आहेस ."मग राजाने तिला स्वतः चे व तिचे पुढील सहा जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार आहे असे सांगितल्यावर राणी धन्य झाली ."
दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले,"

उजैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मनीभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती.ते वृत्त कळताच पृथ्वी वरच्या ईतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला मण्याची मागणी केली .तेव्हा राजाने महा काळे श्वराला साकडे घातले व पूजा आरंभिली .प्रजाजनासमवेत .
त्यावेळी एक तरुण विधवा गवळीन आपल्यां सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते पूजन दुरूनच पहात होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला च शिवापिंड मानून तिची पूजा करु लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला .त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाहीं.म्हणून ती आईं रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले.त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला . शुद्धीवर आल्यावर तो शिवजप करीतच होता.ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन दिले आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित सुवर्ण मंदीर निर्माण केले. ते वृत्त कळताच शत्रू राजांनी चंद्र सेनाची सख्य केले व शिवदर्श ना साठी आले. हनुमंताने प्रकट होऊन त्या मुलाचे नाव श्रीकर ठेवले.तोच श्रीकर पुढें नंद राजा म्हणूaन गोकुळात जन्म ला.बाबा सुतार कारागिरी

बाबा सुतार कारागिरी
गणपती सुतार कारागिरी
यांना मंडपाचा हुकुम करी
त्या मंडपाचा आकार करी
यांनी काय मंडप केला तय्यारी
गुलाबाचे नेले देवळा समोरी
सिहासनावर बसवली बाबांची स्वारी
अंगावर घोंगड़ी व बरोबरी
कपाळी गंध चंदनाचा शिरी
गळ्यामधी सुवर्णाची भंडारी
हातामधी कोटमा व संगिन` तरी
बाबा आपले हो मल्हारी
यावे चांदखेड मुक्कामी तरी
बाबा झाले हो मल्हारीभाऊ गायकवाडास ध्यास लागला मल्हारीचा तरी

मल्हार भक्त श्री भाऊ गायकवाड चांदखेड गावातील एक रामजी बाबांच्या वर श्रद्धा असणारे व्यक्तीमत्व होते तसे ते बाबांच्या समकालीन च होते दर आमावस्या व व पौर्णिमेला तुझ्या दर्शनाला येईन नुसता येणार नाही तर लंगर ,भंडारी ,घोळ व कोटमा बरोबर घेऊन येईन . जागरण घालीन,अमावस्या व पौर्णिमेला येऊन आंघोळ घालीन असा त्यांनाचा नवस होता व ते त्यांनी आयुष्यभर पाळले आपण गावात प्रवेश केल्यावर आप्पासाहेबांच्या वाड्या शेजारीच(रामजी बाबांचा जन्माचा वाडा ) भाऊसाहेबांचा वाडा आहे . थोड पुढं गेल्यावर डाव्या बाजूला एक छोट मंदीर लागते . ते भाऊसाहेबांचे स्मारक रस्त्याला लागूनच आहे . ध्यानस्थ व प्रसन्न अशी सुंदर मूर्ती आहे . पाहिल्यावर नतमस्तक व्हावे असे वाटते ,आशा अनेक महान व्यक्ती चांदखेड गावात होऊन गेल्या आहेत परंतु त्यांनी काहीतरी . असामान्य कार्य केले आहे त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले हे आपण नजरे आड करता कामा नये याच मातीत जन्म घेऊन ते याच मातीत मिसळले आहेत
म्हणूनच ते वंदनीय आहेत .श्री मल्हार भक्त .शाहिर महादू माळी यांनी त्यांच्यावर सुद्धा एक पद तयार केलेले आहे ते पुढील प्रमाणे ----

पद ||13||
भाऊ गायकवाडास ध्यास लागला मल्हारीचा तरी
पंधरा दिवसाचा आमवस्या पुनवेला येईन तुझ्या दरबारात
लंगर भंडारी घोळ कोटमा आखंड बरोबरी
साऱ्या रात्री जागरण करोंनी पाणी तुला घालीन
देव करी परीक्षा खैऱ्या चाले इंगळावरी
भक्ती व मध्ये भक्ती केली ती खैऱ्याने खरी
रामजी बाबांनी भक्ती केली जन्म गेला तरी
रखमाबाई मातोश्वरी यांची पुण्याई खरी
रामजी व बाबा आमचे जन्मले यांच्या या उदरी
राईबाई जाईबाई या सांभाळ करनार
रावजी तुकाराम अज्ञान बाळ देव सांभाळ करनार
देव आज्ञा झाली कैलासी गेली बाबांची स्वारी
महादू माळयाने गायला पवाडा जगजाहिर झाला .सदाशिव तेल्यान किरत पाहा देव यानं पालखीत मिरवीला जी जी

सदाशिव तुकाराम बारमुख (शेठ ) चांदखेड गावातील एक मल्हारी भक्त . त्यावेळी गावा मधील आप्पासाहेब गायकवाड ,भाऊ गायकवाड ,गंगाराम शिंदे ,महादू माळी ,वीठू ,केरू , चि. हरिश्चंद्र ते अतीशय लहान होते त्या बरोबर गावातील लोक सभा भरली होती . लोक होते .बाबांच्या पुण्यतिथीलाच उत्सव भरवायचा हेच ठरले होते . फार मोठा निर्णय झाला होता . त्या मध्ये सदाशिव बारमुख यांनी उत्सवाची जबाबदारी घेतली . काळ गेला लोक गेले परंतु त्यांच्या आठवणी राहिल्या . बाबांचा त्याच तिथीला उत्सव तो आजतागायत चालू आहे त्यात खंड नाही पूर्वी होणाऱ्या धर्मनाथांच्या उत्सवा ऐवजी बाबांचा उत्सव सुरू झाला होता . हे विशेष त्या काळात धर्मनाथाच्या पाराला फार महत्व आहे .सगळ्या सभा या पारावार होत व यशस्वी होत होत्या हे ते लोक जाणत होते . त्यामुळे जे ठराव झाले ते यशस्वी झाले .पारंगाव वाल्यांना रामजी बाबांचा ध्यास लागला व पारंगाव वाल्यांनी सुद्धा गाडे बगाड घेऊन येऊ म्हटले आणि ते अजूनही येतात . सदाशिव बारमुख यांचे वंशज आजही ते विसरत नाही. त्यांनी उत्सवाला पालखी सुद्धा दिली . आजही त्या पालखीत देवाची मिरवणूक असते .त्यांच्या दारात लंगर तुटतो त्यांना मान दिला जातो . आजची त्यांची पीढी तेव्हडाच आदर करताना दिसते. त्यावर शाहिरानी पोवाडा रचला व गंगाराम शिंदे यांनी पिवळा पागोटा शाहीर महादू माळ्याला बांधावा अशी घोषणा केली .सर्वांनी मान्य केली तसे पहाता शाहिरानी वर्णन केले म्हणून इतिहास कळला. त्यानंतर गायकवाड व आगळे बंधु यांचेही बंगाड असतात . सध्या पोवाडा मंडळाने हे पोवाडे मुखोद्गत ठेवले म्हणून बाबा आपल्याला कळले ,आजही आपांसाहेबांच्या वाड्यात पालखी जाते लंगर तुटतो .म्हणूनच म्हणतो जे मोठे झाले,संत महात्मे त्यांचे कर्म तेवढे मोठे होते . त्यांच्या त्यागामुळे ते ध्रुवताऱ्या प्रमाणे अढळ राहिले हेच आपण यातून शिकावे . नियोजन असावे तरअसे.ते पण धर्मनाथाच्या पारावर दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती .जय मल्हार,जय श्री संत रामजी बाबा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹💐💐
||पद 12||
सदाशिव तेल्यान किरत पाहा देव यानं पालखीत मिरवीला जी जी
हरीचंद्र अज्ञान बाळ आले देव सभेला जी
आले देव सभेला चांदीच्या रथाने आनीला
गंगाराम शिंदा येळकोट बोलला पिवळा पागुट
महादू माळयाला जी
पारंगाव वाल्यांना ध्यास लागला मल्हारीचा तरी
अखंड गाड बगाड घेऊन येईल तुझ्या दरबारी
अखंड रामजी बाबा जाई यांच्या पाठीवरी
देव करी परीक्षा खैऱ्या चाले इंगळावरी
भक्ती व मधी भक्ती केली तरी खैऱ्यानी खरी
रामजी बाबांनी भक्ती केली जन्म गेला तरी
रखमाबाई मातोश्वरी यांची पुण्याई खरी
रामजी व बाबा आमचे जन्मले यांच्या या उदरी|| रामजी बाबा जन्माचे पद ||

|| रामजी बाबा जन्माचे पद
श्री संत रामजी बाबा गावात वास्तव्य करून राहिले ,परंतु त्यांची भक्ती एवढी मोठी होती की त्यांचे निर्वाण झाल्यावर . त्यानी स्वप्नात दृष्टान्त दिला,मला देवासमोर बसवा . गावातली सर्व मंडळी एकत्र येऊन बाबांची समाधी बांधायचा विचार केला व त्याचे सर्व वर्णन शाहीर महादू माळी यांनी केले आहे पहा .

|| पद 7||

कोऱ्हाळ्यांच्या पायथ्याशी मांडली स्वारी
न देव मल्हारी राजा मल्हारी
नऊ महिने नऊ दिवस तरी
बाबा धरतरीच्या उदरी
नऊ महिन्यांनी स्वप्नात तरी
कुशाबा गायकवाड पाटिल तरी
दादा गायकवाड पाटील तरी
तुकाराम पाटलांची मदत गिरी
यांच्या काय स्वप्नात बाबांची स्वारी
गावकरी मंडळी जमली सारी
पारावर बसून विचार करी
खोर कुदळ खांद्यावरी
मिथुन पा गेले बाबांच्या तिरी
विठु वाघ्या ठोकी खंजिरी
धोंडीबाच्या अंगात रहिवास करी
हब हब करतोय नाना परी
भंडार पहा टाकलाय धरणीवरी
महादू माळी खोऱ्यानी माती वारी
खोर पा लागलं नाकाच्या शिरी
रक्ताचा पुंज आला वरी
दादा हो घाट झाला वयरी
खैरा हातांनी माती वारी
दहा पांच मंडळी उचला तरी
तिळभर हलाना जाग्यावरी
पहिला लंगर लावा तरी
पहिला लंगर वरच्या वरी
दुसरा लंगर लावा तरी
दुसरा लंगर वरच्या वरी
तिसरा लंगर लावा तरी
तिसरा लंगर तुटलाय वरी
गावकरी येळकोट बोलले तरी
बाबा फुलावाणी आले वरी
नऊ महिने नऊ दिवसांनी तरी
जन्मले धरतीच्या उदरी
अंगावर घोंगडी व बरोबरी
कपाळी गंध चंदनाच्या शिरी
मुखामधी विडा व संगिन तरी
तुळशीची माळ उरावरी
गळ्यांमधी सुवर्णाची भंडारी
हातामधी कोटमा व संगिन तरी
कुठं नाही ठकली बाबांची स्वारी
बाबा बसवले खडकावरी
बाबा विरुळयाचे आंघोळ घ्या तरी
बाळा धोंडी व सेवा करी
खैरे पाटील बरोबरी
आप्पासाहेबांच्या वाड्यासामोरी
तिथ काय होती बाबांची स्वारी .
तो एक लंगर लावा तरी
तो एक लंगर तुटलाय तरी
बाबा घ्यावा कऱ्हेवरी
बाबा बसवले पायऱ्यावरी
बाबा कऱ्हेची अंघोळ घ्या तरी
बाळा धोंडी व सेवा करी ||3||
रावजी चिमाजी मीठया मारी
विठू केरू उभ्याने अंग टाकी तरी
भीमबाई समजूत करा तरी
खैरे पाटील बरोबरी
तो एक लंगर लावा तरी
तो एक लंगर तुटलाय तरी
बाबा घ्यावा गावा तिरी
बाबा आणले देवळा समोरी
त्या लंगरांची व बेरीज करी
सात लंगर लागल्यात तरी
सात लंगर तुटल्यात तरी
बाबा आमचे हो मल्हारी
यावे चांदखेड मुक्कामी करी
बाबा झाले हो मल्हारी
बाबांनी भक्ती केली तरी
बाबांचा जन्म गेला तरी
रखुमाबाई मातोश्री
जन्मले यांच्या हो उदरी
चांद खेड नगरी अजाब गुजरी
नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गड सोन्याची जेजूरी
चांदखेड नगरी अजाब गुजरी
नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गडाला नऊ लाख पायरी
********************************डावा डोळा लवे उजव्या बाहीची फुरफुरी ..

श्री संत रामजी बाबा यांचे महानिर्वाण झाल्यावर नित्य नेमाने त्यांची सेवा करणारे भक्त मुंबईला रहात असत परंतु वेळे परत्वे ते बाबांच्या दर्शनाला येत त्यावेळी त्यांना काय अनुभव आला तो अनुभव शाहीर महादू माळी यांनी या भागातवर्णन केला आहे . तो अतिशय हृदय स्पर्शी आहे.
||पद 06||
डावा डोळा लवे उजव्या बाहीची फुरफुरी ..
रात्री हो संपान पडलं बाबाजी तरी
रात्री हो सपान पडलं बाबाजी तरी
बारा जिल्ह्याच्या गाडीत चला जाऊ लवकरी
बारा जिल्ह्याच्या गाडीत चला जाऊ लवकरी
तलेगांवच्या चक्रावर आडवं गेलं ते मांजार
दहा पाच पाऊले टाकीता मनात उचका भरे
तलेगांवच्या खिंडीत हरिबा भेटला कासार
चांदखेड नागरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
आमच्या बाबांचा वर्तमान कसा आहे सांग तरी
आमच्या बाबांचा वर्तमान कसा आहे सांग तरी
आमचे हो बाबा गेले कैलासा कालच्या सोमवारी
रामजी हो गेले वैकुंठा कालच्या सोमवारी
वैकुंठी जाऊनी बाबा ते झाले मल्हारी
विठु केरू बाळा धोंडी दोन ती माऊली
विठु केरू निघून चालले बाबांच्या जवळीखांदकऱ्याच्या मळ्यामंदी कडा परीक्षा खरी रे ..

श्री रामजी बाबा पोवाडा
|| पद 03 ||
मनमाळीव ताकीद करी फूल तो आणी सकाळच्या पारी
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
खांदकऱ्याच्या मळ्यामंदी कडा परीक्षा खरी रे ..
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
कडा परीक्षा खरी विठोबा चिकणे बरोबरी रे
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
विठोबा चिकणे बरोबरी नं रामजी बाबा सेवा करी रे
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
रामजी बाबा सेवाकरी नं खैरे पाटील बरोबरी रे
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
भक्ती मधी भक्ती केली ती खैऱ्या रे
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
रामजी बाबा ने भक्ती केली जन्म गेला तरी त रे
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
चांदखेड नागरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारीश्री. संत रामजीबाबा महाराज आरती

आरती रामजी बाबा
स्वामी सत्पुरुष बाबा
मल्हार तुझ पुजती
पाय दाखवी आम्हा || धृ ||

बारा वर्षांची भक्ती
झाली संपूर्ण पूर्ती
गेले ते निजधामा ||१||

आरती रामजी बाबा
स्वामी सत्पुरुष बाबा
मल्हार तुझ पुजती
पाय दाखवी आम्हा || धृ ||

नऊ महिने नऊ दिवस तरी
जन्मले धरीत्रीच्या उदरी
भक्ती दाविली विश्वजना ||२||

आरती रामजी बाबा
स्वामी सत्पुरुष बाबा
मल्हार तुझ पुजती
पाय दाखवी आम्हा || धृ ||

मल्हार मल्हार स्मारता
झाले मल्हार रूप
बैसले देवा समोरी
करी भक्तांचा उद्धार
लक्ष्मण भक्त लोळे चरणावरी||३||

आरती रामजी बाबा
स्वामी सत्पुरुष बाबा
मल्हार तुझ पुजती
पाय दाखवी आम्हा || धृ ||
🌹🌹🌹🌹🙏🙏गाव चंदनपूर शहर जी,

🌹🌹🌹🌹|| पद ०३||🌹🌹🌹

गाव चंदनपुर शहराजी जी जी
आरे होरे गाव चंदन पूर शहराजी
तिथं नांदे देव मल्हार जी जी जी
आरे हो रे
तिथं नादे देव मल्हार जी जी जी
बेल तांब्या हातात फुलंजी जी जी आरे हो रे
बेल तांब्या हातात फुलहा जी जी
रामजी बाबा सेवा करती जी जी जी आरे हो रे
रामजी बाबा सेवा करीहा जी जी
खैरे पाटील बरोबरी हा जी जी आरे हो रे
खैरे पाटील बरोबरी हा जी जी
बाबांनी भक्ती केली जी जी आरे हो रे
बाबांनी भक्ती केली जी जी आरे हो रे
बाबांचा जन्म गेला जी जी आरे हो रे
बाबांचा जन्म गेला हा जी जी
चांडखेड नगरी अजाब गुजरी, नांदे देव मल्हारी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹शाहीर महादू माळी लिखित,पद, मशिदी वर श्रद्धा

श्री शाहीर महादू माळी यांनी गावातील मशिदी पासून बाबांची महती वर्णन केली आहे.त्यामध्यें बाबांची भक्ती वर्णन आहे. जेजुरी ते चांदखेड गावापर्यंत वर्णन आहे.कोर्हाळयाच्या पायथ्याचे वर्णन आहे. पादुकांचे वर्णन आहे. मशिदीचे वर्णन आदी शक्ती प्रमाणे केले आहे तिची छाया सर्वांवर आहे.या ठिकाणी आई ज्योगेश्वरी प्रमाणे आई मशिदी ,रामजी बाबा यांना लोक मानतात निजामाची कन्या चांदबीबी हिचे वास्तव्य या गावाला होते. तिने मशीद बांधली असे म्हणतात ते अतिशय जागृत ठिकाण मानतात . त्यामुळेच गावाला चांदखेड नाव प्राप्त झाले गावाच्या पश्चिम दिशेला लोहगड ,विसांपूर ,तिकोना तूंगी व राजमाची ही किल्ले आहेत . व ते निजामच्या अखत्यारीत होते.,छत्रपती श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांनी भव्य आकाराचे नगारे वाहिले आहेत . सयाजीरावांची फार श्रद्धा होती असे लोक सांगतात. म्हणून तिला निशान अर्पण आहे.दर वर्षी उत्सवात निशाण लावले जाते. वासुदेव बळवंत फडके यांचे बंड रात्री आले गावाला वेढा पडला सांगतात त्यावेळी दादा गायकवाड यांच्या नवसाला पावली व कोंबड्याची बांग झाली ब्राम्हणाच्या शेतात सर्व संपत्ती टाकून ते निघून गेले. म्हणून मशिदीवर श्रद्धा आहे असे सांगतात . केवढी ही भक्ती बाबांची व्यक्त केले आहे याचे आपण सर्व सामान्य वर्णन करू शकत नाही.इतकी ती महान आहे. रामजी बाबा तर स्वतः मल्हारी आहेत.त्या काळात त्यांनी जे केले ते कोणाला शक्य नव्हते.त्या मल्हारी ला ज्यांनी ओळखले ते भक्त झाले.अशी परिस्थिती होती. त्यांच्या इतकी भक्ती फक्त मल्हारी भक्त खैरे यांनीच केली. एवढे ते महान होते.म्हणूनच बाबांच्या रुपात स्वतः मल्हारी येथे वास्तव्य करून आहेत असे म्हणतात.त्या प्रमाणे शाहीर महादू माळी यांनी
त्यांची रचना केली आहे.

------------,||पद 02||-----------

गावामधी आईं मशिदी आहे फुल असरी
तिचे नाव घेता विघ्न होते दूरच्या दूरी
गावामधी आईं मशिदी आहे फुलअसरी
आई व मशिदीचे व निशान चांदेराव बराबरी
गावामधी आईं मशिदी आहे फुल असरी
कडे पठा रावरुन स्वारी आली कोऱ्हाळ्याच्या पायथरी
खडक फोडून लिंग निघाली हे एक नवल परी
गावामधी आईं मशिदी आहे फुल असरी
रामजी बाबाची स्वारी गेली कोऱ्हाळ्याच्या पायथरी
हाथी व फुलं बेल तांब्या बाबा चरणावरी
गावामधी आई मशिदी आहे फुल असरी
रामजी बाबाची माझ्या पाउथक आहे कऱ्हेवरी
रामजी बाबाची माझ्या पाउथक आहे कऱ्हेवरी
गावामधी आईं मशिदी आहे फुल असरी
चांडखेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गड तुझी सोन्याची जेजुरी
चांदखेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गडाला नऊ लाख पायरी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹श्री रामनवमी

श्री रामनवमी

चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी म्हणजे राम नवमी हा उत्सव तसा फार मोठ्या प्रमाणात भारतात साजरा केला जातो.भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे श्री राम होय.मर्यादा पुरुषोत्तम म्हणून रामाचा उल्लेख केला जातो.याच दिवशी कौशल्ये च्या पोटी रामाचा जन्म झाला.विष्णूचा अवतार म्हणून त्याला देवत्व मिळाले.रामाची मंदिरे संपूर्ण भारतात बांधली आहेत.या मंदीरात राम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.या दिवशी दुपारी सर्व लोक मंदिरात जमतात .कथेकरी कीर्तन करतात यां मध्ये रामाची जन्म कथा सांगितली जाते.पाळण्यात रामाची प्रतिमा ठेऊन जन्मोत्सव साजरा करतात.आयोध्या या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

रघुपती राघव राजाराम|पतीत पावन सीताराम |
ईश्वर अल्ला तेरे नाम |सबको संमती दे भगवान ||
मंदिर मस्जिद तेरे धाम| सबको जन्म दिया भगवान |
गोविंद गोविंद हरे मुरा रे |गोविंद गोपाळ मुकुंद कृष्ण||
वैष्णव जन तर तोची म्हणावा |जो परापीडा जाणि रे|
पर दु:खी उपकार करी तरी|मनी अभिमान न आणि रे||
सकाळ जनी सर्वांसी वंदी|निंदा करी न कुणाची रे|
वाचा तन मन निश्चल राखी|धन्य तयाची जननी रे||
समदृष्टी जो तृष्णा त्यागी | परकोता ज्या माता रे|
असत्य वाचना वदे न रसना |कर न परधना स्पर्शी रे||२||
मोह माया व्यापिती ना या|दृढ वैराग्य वसे मनी रे|
नामस्मरणी लागली टाळी|तनु तार्थ खनी त्याची रे||३||
लोभ कपट विरहित जो निश्चल |काम क्रोध निवारी रे|
म्हणे नरसैय्या दर्शन त्याचे कुले एकशत तारी रे||४||

संत नरसी मेहता,°°°°°°°°°°°°°