भीमाकोरेगाव ची लढाई

कोरेगावची लढाई : ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडीचे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसराकरीत होता. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. १८००च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती. या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व मराठा साम्राज्याचा अस्त झाला.
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — One of the Triumphs of the British Army of the Earthकि
महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध , दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.
इ.स. १८००च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यांमुळे कमकुवत साम्राज्य होते. ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. १३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले. अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाईत केला परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली होती. त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली. दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले. डिसेंबर इ.स. १८१७च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली. मराठ्यांचे २८,००० सैन्य होते, ज्यातील २०,००० घोडदळ, ८००० पायदळ सतत तैनात असे. कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत. या सैनिकांत अरब, गोसावी व मराठा जातीचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे. सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे ह्यांनी केले होते पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते. तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते.
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे ८३४ सैनिक होते. दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे ५०० सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट हे होते. लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे ३०० सैनिकांचे घोडदळ होते. २४ युरोपियन आणि ४ तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा होत्या. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम (Chisholm) करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्यात समावेश होता. महारांचे नेतृत्व रतननाक, जाननाक व भकनाक हे तिघांनी केले.
पेशवा दुसरा बाजीराव नासिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. ३० डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याचे स्मिथ यास दिसून आले, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. स्टॉंटन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. ३१ डिसेंबर इ,स. १८१७ रोजी रात्री ८ वाजता शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. स्टॉंटनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतानी आज्ञा केली, की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. रात्री ९ वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले. इंग्रजांचे २७५ मारले गेले तर १७५ जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे ५००-६०० लोक पडले. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून जनरल स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. २ जानेवारी इ.स. १८१८ रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोचला. त्याच दिवशी कॅ. स्टॉंटन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.
हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.



गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा असे का ?

महाभारत या ग्रंथाचे लेखक महर्षी व्यास होते .त्यांनी श्री भगवान गणेशाला लिहिण्याची विनंती केली. त्यांनी (गणेशाने)सांगितले की जर तुम्ही महाभारत सांगण्याचे थांबलात तर मी लिखाण तेथेच ठेवेन. ते महाभारताचे रचनाकार च नाही तर ते प्रत्येक घटनेचे साक्षीदार सुद्धा आहेत. जी घटना एकापाठोपाठ झाली .त्यामुळे हस्तीनापुर मध्ये घटनाचे त्याच्यापर्यंत पोहचत होत्या. त्या घटनेवर ते प्रतिक्रिया सुद्धा देत असत.
त्याबाबत माता सत्यवती विचार विनिमय करण्यासाठी आश्रमात येऊन जात असतं .तर कधीकधी त्यांनां राजवाड्यात निमंत्रित केले जाई . प्रत्येक द्वापार युगात श्री विष्णू व्यासांच्या रूपाने अवतार घेत असत. आणि वेदांचा भाग सांगत असतं. पाहिल्या द्वापार युगात सवस् तः ब्रम्हा होते. दुसऱ्या द्वापार युगात प्रजापती हे व्यास होते. तिसऱ्या द्वापार युगात शुक्राचार्य हे वेदव्यास होते. चौथ्या द्वापार युगात बृहस्पती वेदव्यास होते. अशाप्रकारे सूर्य, मृत्यु, इंद्र,धनंजय, कृष्ण द्वायंपायन अस्वस्थामा,असे अठ्ठावीस वेदव्यास झाले. म्हणजे जवळ जवळ अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले आहे. त्याचं प्रमाणे त्यानी आठरा पुराणांच्या रचना केल्या आहेत. वसिष्ठ ऋषी चे पुत्र शक्ती होते शक्ती चे पुत्र पराशर व पराशरांचे पुत्र वेदव्यास होते.
फार प्राचीन काळी सुधनवा राजा राज्य करीत होता. तो शिकारीसाठी दूर जंगलात अनेकदिवांपासून गेला होता.राजाची राणीने राजाला पक्षाच्या सहाय्याने प्रणय संदेश दिला. राजाने वीर्य पक्षाच्या बरोबर द्रोणात पाठवून दिले.हा शिकारी पक्षी द्रोण घेऊन अकाशामार्गे जात असताना दुसऱ्या एका शिकारी पक्षाशी त्याची गाठ पडली.त्या दोघांत खूप मोठे युद्ध झाले. त्यामध्यें हा द्रोण यमुना नदीत पडला त्या नदीत ब्रम्हदेवाच्या शापाने एक अप्सरा माश्याच्या रुपात वास्तव्य करीत होती.ते वीर्य तिने प्राशन केले. किंवा ग्रहण केले.अथवा न कळत स्वीकारले गेले. मशाच्य पोटात तो गर्भ वाढत होता.अशी कथा आहे. पुढें एका कोळी मासे पकडताना त्याच्या जाळ्यात तो मासा सापडला.त्याला कापल्यावर त्यामध्यें दोन बालके निघाली त्यात एक मुलगा व एक मुलगी होती.तो त्या बालकांना घेऊन सुधनवा राजाकडे गेला.राजाने दोन्हीपैकी एका मुलाला स्वतः कडे ठेऊन घेतले. मुलगी मात्र त्या कोळ्याकडे राहीली. मुलाचे नाव मत्स्याराज ठेवले व मुलीचे नाव मत्स्यगंधा ठेवले तीच्या अंगाचा माशाचा वास अथवा गंध येत होता.ती जेव्हा मोठी झालो त्यावेळीं ती नावाड्याचे काम करू लागली.नाव चालवीत असताना एक दिवस पराशर मुनी त्या नावेत जात होते. पराशर मुनी तिच्या सौंदर्यावर भाळले व म्हणाले मुली तू खूप सुंदर आहेस तरी मी तुझ्याबरोबर सहवास करू इच्छितो त्यावर सत्यवती म्हणाली मुनीवर तूम्ही ब्रम्हज्ञान सांगता म्हणजे ब्रम्हज्ञानी आहात मी एक निषाद कन्या हे कास जमणार ते म्हणाले त्याची काळजी करू नको.
आणि ते त्यात विहार करू लागले. त्यामध्यें मत्स्यगंधा गरोदर झाली तिला एका पुत्र झाला. पराशर मुनींनी तिला सांगीतले तिच्या अंगाला जो माशाचा वास यायचा तो सुगंधात निर्माण झाला. पुढें हा मुलगा वेद पारंगत झालं व तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. पुढें तोच वेदव्यास झाला.

व्यास त्रिकालज्ञानी होते त्यांना कळत होते कलियुगात हिंदुधर्म क्षीण होणार आहे. यामुळे मनुष्य नास्तिक, कर्तव्याचीजाणीव ठेवणार नाही, अल्पायु होईल .वेदांचा अभ्यास करणे त्याच्या शक्तीबाहेरचे होईल. म्हणून त्याचे चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद त्या मुळे वेदांच विभाजन केले म्हणून त्यांना व्यास असे म्हणू लागले.ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद,अथर्ववेद यांचे ज्ञान त्यांनी ऋग्वेदा ची शिष्य होते पैल मुनी,तर यजुर्वेद शिकविला जैमिनी ऋषि यांना. सामवेद वैशंपायन मुनी यांनी अभ्यासला.तर अथर्ववेद केला सुमंतुमुनी यांनी अध्ययन केला.असे होते व्यासांचे शिष्य वेदांची रचना झाली परंतु ते अतीशय रुक्ष वाटे.म्हणून व्यासांनी 18पुराणांची रचना केली. त्यामध्ये रंजक कथांची रचना केली आहे त्यालाच पाचवा वेद असे म्हणतात. पुराणांचे ज्ञान त्यानी आपले शिष्य रोम हर्षण याला शिकविले.महाभारत, आठरा पुराणे, श्रीमद्भागवत, ब्रम्हासुत्र , मीमांसा यांचे प्रणेते व्यासच आहेत.त्यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता.तो यमुनेच्या तिरी.त्याचा कालखंड सुमारें 3000वर्षापूर्वी झाला.म्हणूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. पत्नी अरूनी पासून त्यांना शुकडेव नावाचा मुलगा झाला.तो अतीशय ज्ञानी होता.त्यानी आपल्या शिष्यांना महाभारताचे ज्ञान दिले. त्यामूळे त्यांच्या कार्याची कल्पना येते.


नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।।
व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे।
नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।
एवढे महान होते व्यास महर्षी.



चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म23 जुलै1906 रोज़ी मध्यप्रदेशातील झाबुआ तालुक़्यातील झावरा या गावात झाला.पंडीत सिताराम हे त्यांचे वडीलांचे नाव होते ,त्यांच्या आईचे नाव जनदानीदेवी असे होते.बनारस येथे अध्ययन क़रीत असताना वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला ते येवढे लहान होते की त्यांच्या हाताला बेड़ी बसेना ब्रिटिश न्यायालयाने बारा फटक्यांची अमानुष शिक्षा दिली होती फटक्यांची शिक्षा दिली होती त्या प्रसंगामूळे त्यांच्या मनात राग राहिला त्यामुळे अहिंसेवरील त्यांचा विश्वास उडाला होता मनाने ते क्रांतिकारक बनले काशित श्री प्रणवेश कणी यांनी त्यांना क्रांतीची दीक्षा दिली सन 1921 साला पासूंन ज्या क्रांतीकारानी चळवळी,प्रयोग,योजना,क्रांतिकारी पक्षाने योज़ल्या त्यामध्ये चंद्रशेखर आझाद अग्रेसर होते पोलिस अधिकारी साँडर्सचा बळी घेतल्यावर नागपूर या ठिकाणी क्रांतीकारकांचे केंद्र बनले त्यानी अनेक अधिकार्यांच्या हत्या क़ेल्या सुपरीटेण्डेंट विश्वेश्वर सिंह राजगुरूनी अचूक टिपले परंतु दुरदैवाने आझाद याना पकड़ण्यात आले .इंग्रजांच्या हातून मरण पत्करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाड़ून मातृभूमिला समर्पण केले.आशाप्रकारे दिनांक 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद देशासाठी हुतात्मे झाले.



ह.भ.प. सोनोपंत दांडेकर Sonopant Dandekar

सोनोपंत दांडेकर,यांचा जन्म २० एप्रिल १८९६ मध्ये झाला. त्यांचे नाव शंकर वामन दांडेकर असून ते सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते. त्यांचा जन्म एका सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे झाला. त्या सुमारास दांडेकर कुटुंबीय केळवे माहीम येथे राहत होते. परंतु मलेरियाच्या साथीमुळे त्यांच्या जन्म झाल्यावर दांडेकर कुटुंब केळवे येथील वाडीत राहायला गेले होते. ते दीड वर्षांचे असताना त्यांचे आईचे निधन झाले; मात्र वडिलांनी त्यांच्या शिक्षण-संवर्धनाकडे पूर्ण लक्ष दिले होते .
त्यांचे प्राथमिक शिक्षण केळवे माहीमच्या प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. सन1905 मध्ये ते माध्यमिक शिक्षणासाठी त्यांच्या बंधूंसह पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाले अतीशय कुशाग्र बुद्धीमत्ता होती त्यानंतर सन 1912 मॅट्रिकची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण झाले यावेळी त्याच सुमारास ते विष्णुबुवा जोग या अध्यात्मवादी धार्मिक साक्षात्कारी पुरुषाच्या संपर्कात आले. त्यांचा प्रभाव नकळत त्यांच्यावर पडला विष्णू नरसिंह जोग लोक त्यांना ‘जोग महाराज’असे म्हणत,त्यांचा वारकरी सांप्रदायावर फ़ार मोठाप्रभाव होता .हे वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक होते . अध्यात्म ज्ञानेश्वरीचा गाढ़ा अभ्यास होता.अध्यात्माचे अधिष्ठान असल्यामूळे लोकमान्य टिळकांचे निकटचे मित्र होते. सोनोपंतांना जोग महाराजांमुळे हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लहान वयातच लागली. सन 1917 मध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली. त्या काळी रॅंग्लर र. पु. परांजपे, गुरुदेव रा. द. रानडे अशा अनेक नामवंत व्यक्ती तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांपैकी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे व जोग महाराज या दोन उत्तुंग व्यक्तींच्या सहवासाचा सोनोपंतांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे अध्यात्माचे ज्ञान व अभ्यासू व्रुत्ती असल्याने त्यांना यश मिळत राहिले ,कठोर परिश्रम हे प्रमाण होते. त्यांना मुंबई विद्यापीठाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली होती आणि गुरुदेव रानडे यानी त्यांना नेहमीच मार्गदर्शन करीत त्यांच्या सानिध्यात असल्याने यांच्या सांगण्यावरून सन 1919 मध्ये पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.अध्यापनाची आवड असल्याने त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे आजीव सदस्यत्व घेऊन शिक्षणक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला व न्यू पूना कॉलेजात तथा सध्याचे स. प. महाविद्यालय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तेथे सन 1921मध्ये सोनोपंतांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली . त्या मंडळात व्याख्यान देण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आले होते त्यावेळी असताना ते सोनोपंतांविषयी म्हणाले होते , ‘‘I see nothing less in Prof. Dandekar a true follower of my friend Prof. R.D. Ranade – a great philosopher of today.’’ वरील उद्गारावरून तरुणपणीच त्यांची योग्यता किती मोठी होती नोकरी करत असताना आषाढी वारी कधी चुकविली नाही. ते त्या काळात रजा काढ़त इतकी त्यांची वारीवर श्रद्धा होती ते अध्यात्म वादी होते हे लक्षात येते पुढे सन 1934 मध्ये नूतन मराठी विद्यालयाचे प्रमुख मुख्याध्यापक उत्तम कार्य केले .नंतर 1940 मध्ये मुंबई येथील रुईया महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले ,ती कारकिर्द अतीशय चांगली होती परंतु पुढे सन 1945 मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य झाले सन 1947 मध्ये प्रसाद मासिकाचे संपादक झाले. पुढे सन 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना व्हावी या साठी त्यानी पुढ़ाकार घेतला हे न विसरण्यासारखे आहे सन 1950 मध्ये ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून सेवा निवृत्त झाले.
वारकर्यांचे प्रबोधन ,अंधश्रद्धाचे निर्मूलन ,कीर्तन संस्थेचे कार्य यासाठी त्यानी खूपच प्रयत्न केले.
सेवा निवृत्ती नंतर त्यांनी नेवासे येथील मंदीराचा जीर्णोद्धार केला 1963 मध्ये हे काम झाले नेवासे येथील ज्या खांबाला ज्ञानेश्वर महाराज टेक़ून बसत तेथे मंदीर बांधले जत संस्थानाच्या राणी साहेबानी माउली च्या चरणी सोन्याचा कळस प्रदान केला तो त्यांच्याच काळात सोनोपांतानी स्वहस्ते तो कळस बसविला पूढे पिंपळनेर येथील निलोबाराय मंदीर,निवडूंग्या विठोबामंदीर यांचा जीर्णोद्धार केला आहें
मामासाहेबांचे फ़ार मोठे आहे ते ज्ञानेश्वरीची संशोधीत आवृत्ती काढण्याचे कार्य सन1956 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली गेली या ज्ञानेश्वरी मध्ये 150 पानाची प्रस्थावना लिहीली आहे या प्रतीला दाण्डेकरांचीज्ञानेश्वरी म्हाणून ओळखली जाते आजन्म ब्रम्हचारी राहूनवारकरी सांप्रदायाचे कार्य केले गुरुवर्य जोग महाराजांचा वारसा त्यानी जपला वारकरी सांप्रदायाची अध्यक्षपदाची ज़बाबदारी त्यांनी बराच काळ सांभाळली आहे.मामासाहेबांच्या सेवकार्यानंतर दि 9 जुलै1968 मध्ये त्यांचे निधन झाले सन 1970 मध्ये सोनोपंथांच्या नावाने शिक्षण संस्था पालघर येथे ग्रामस्थांनी सुरु केली.असे होते मामासाहेब दांडेकर .



शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप साहेब जीवन दर्शन भाग ०२

जे का रंजले गांजले |त्यासी म्हणे जो आपूले||
तोचि साधू ओळखावा |देव तेथेची जाणावा||

असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
असे अनेकांच्या नजरेतून शिक्षण महर्षी ठरले बाबुराव घोलप साहेब.

बाबुरावजी घोलप साहेब म्हणजे मराठी माणसाने समाजासाठी केलेला एक विचार आहे आपण समजून घेणे अपेक्षित आहे.जेव्हा आपण पुण्यापासून १०० किमी. अंतरावर जातो त्यावेळीं आश्चर्य वाटते त्यामध्यें अनेक वाड्या वस्त्या ते फिरले, कोंडवाड्याचे रजिस्टर पहाताना त्यांना रजिस्टरवर आंगठेच आंगठे दिसत त्यामुळे त्यांना ग्रामीण भागात शाळा सुरू कराव्यात असे वाटू लागले. साक्षरतेचा प्रसार व्हावा असे त्यांना वाटत होते .कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली हा त्यांच्यापुढे आदर्श होता. गावागावाचे लोक शाळांची मागणी करू लागले. त्यावेळीं, शाळेसाठी,खंडोबा मंदीर, मारूती मंदीर,विठ्ठल मंदीर, चावडी अशा कोणत्याही जागेवर शाळा सुरू झाल्या. सुरुवातीच्या काळात श्री.एम.एन.डीखळे व श्री.एच.जी. मसुडगे यांना पर्यवेक्षक म्हणून नेमले होते. घोलप साहेबांनी पुणे जिल्हयातील सर्व व्हालंटरी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सर्व शाळा चालकांची सभा दिनांक ७सप्टेंबर १९४१ रोजी बोलावण्यात आली. सध्या असणाऱ्या शाळांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. यासाठी एक शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले. त्यावेळीं अण्णासाहेब आवटे यांच्या अध्यक्षते खाली एक घटना समिती स्थापन करण्यात आली.या समितीत घोलापसहेबही होते त्याचप्रमाणे शारदाबाई गोविंदराव पवार होत्या.या घटना समितीने एक घटना तयार केली.दिनांक ७.११.१९४१ रोजी सभा भरविण्यात आली व त्या सभेत घटना मंजुर करून संस्थेचे नाव , पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे असे देण्यात आले.
पहिली घटना इंग्रजीत तयार करण्यात आली.त्यावेळचे अध्यक्ष होते,आण्णासाहेब आवटे ,उपाध्यक्ष, बापूसाहेब जेधे व ऑनररी सेक्रेटरी,व ट्रेझरर होते बाबुरावजी घोलप साहेब.अशी निवड झाली होती.१९५२ मध्ये ही संस्था मुंबई पब्लिक ट्रस्ट नियमानुसार रजिस्टर करण्यात आली संस्थेस ए ९९ क्रमांक मिळाला.आंबेगाव तालुक्यात शिक्षण प्रसार करणाऱ्या शिवाजी मराठा शिक्षण संस्थेच्या ५१ शाखा शिक्षकांसह जोडण्यात आला त्यामुळे १९५६ मध्ये शाळांची संख्या ३७९ झाली ही अभिमानाची बाब आहे.
सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी संस्थेमार्फत इंग्रजी शाळा सुरू कराव्यात आशी सूचना मांडली. त्यानुसार १९५६ मध्ये भोर तालुक्यातील नसरापूर येथे राममंदिरात शुभारंभ करण्यात आला. घोलप साहेबांनी लावलेल्या ज्ञानवृक्षाची भक्कम सावली आज अनेकांच्या सुखी संसाराची छाया देत असून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्ती प्रमाणे संपूर्ण पुणे जिल्ह्यात हजारो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे आले आहेत.ग्रामीण भागात सर्वत्र अंधार,अज्ञान, दारिद्रय त्यामूळे साक्षरतचेचे प्रमाण ५ ते ६ टक्के होते.

बुडते हे जन | न देखवे डोळा|| येतो कळवळा म्हणूनिया||

या न्यायाने दारिद्र्यात खितपत पडलेल्या या अडाणी लोकांसाठी काहितरी काम करायला हवे. संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या ५६ पर्यंत झाली होती.अनेक विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत.सन १९७० मध्ये आमदार श्री कृष्णशेठ तांबे यांच्या प्रयत्नाने संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू झाले.घोलप साहेबांनी सत्तरी गाठली होती. परंतु शाळा भेटी, हिशोब तपासणे व सेवकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रवास करावा लागे. संस्थेच्या सेवक वर्गाने गाडी घेण्याचा निर्णय घेतला व पैशाची जमवा जमव सुरू झाली घोलप साहेबांना हे समजल्यावर त्यांनी गाडी घेण्यास नकार दिला.सेवकांनी सन १९६३ पासून शामराव जगताप पुणे जिल्हा शिक्षण मंडळात सहभागी झाले.त्यांचा घोलप साहेबांना जास्त सहभाग लाभला.मामासाहेब मोहोळ,शंकरराव उरसळ,काकासाहेब भेलके,मामासाहेब पिंपळे यांच्या प्रमाणे प्रत्येक शाखेत व गावात त्यांचे ऋणानुबंध होते.लोक घोलप साहेब येणारं म्हणून त्यांची वाट पाहत.त्या काळात शाळेसाठी स्वत:ची जागा विनामूल्य संस्थेला लोकांनी दिली.ते घोलप साहेबांच्या आदरामुळेच अतीशय ग्रामीण भागात शिक्षक काम करीत होते.ज्ञानयज्ञ अखंड चालू आहे. साहेब अखंड पणे कार्य करीतच होते त्यानी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला होता.अचानक त्यांची प्रकृती खालावली होती शेवट पर्यन्त ते संस्थेची काळजी करत होते. सर्व शाखा प्रमुख,प्राचार्य,प्राध्यापक,आणि अध्यापक यांनी अर्पण केलेलीं १,००५०१ रुपयांची थैली साहेबांनी सौ. लक्ष्मीबाई व स्वतः ची रक्कम घालून ती सर्व रक्कम पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ,पुणे या आपल्या संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी तत्कालिन अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचेकडे सुपूर्त केली.१९८२ चा उन्हाळा वाढला होता.घोलप साहेब आजारी पडले.त्यांना रुबी नर्सिंग होम मध्ये येथे दाखल करण्यातआले.लोकांची वर्दळ वाढली महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लोक भेटण्यास येऊं लागले.मामासाहेब मोहोळ व आप्पासाहेब बांदल भेटायला आले . त्यांना पाहताच घोलपसाहेबांच्या हृदयात दाटून राहिलेला हुंदका फुटला.लहान मुलासारखे ते रडू लागले.डोळ्यातून अश्रू वहात होते.प्रयत्न करून सुद्धा शब्द फुटत नव्हता .अखेर ते म्हणाले मामासाहेब माझ्यामागे माझी संस्था सांभाळा .आता माझे काही खरे नाहीं.मामासाहेब म्हणाले तुम्ही चिंता करू नका . तुमच्या सर्व इच्छाची पूर्तता होईल आमची एकच इच्छा आहे . तुम्ही लवकर बरे व्हावे . हृदयाला पीळ पाडणारा असा हा घोलपसाहेब मामासाहेब यांच्या भेटीचा प्रसंग घोलप साहेबांनी हात जोडले व म्हणाले ,

आम्हीं जातो आमच्या गावा| आमचा रामराम घ्यावा ||

२६ मे १९८२ सायंकाळची वेळ सूर्य मावळतीला निघालेला . त्याच वेळीं हा ज्ञानसूर्य अनंतात विलीन होण्याची घाई करत होता आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान , विद्यार्थ्यांचे गुरुस्थान, शिक्षक, आणि सेवकांचे स्फूर्तिस्थान असणारे घोलप साहेब अनंतात विलिन झाले. बहुजन हिताय ,बहुजन सुखाय हे ब्रीद त्यानी साकार केले होते. म्हणूनच त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप साहेब जीवन दर्शन भाग१

आपल्या महाराष्ट्रात अनेक महान,आदर्श व्यक्तिमत्व व
आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ होते त्यातील बाबुरावजी घोलप साहेब हे होते .शिरुर या तालुक्यात कान्हूर मेसाई नावाचे गाव आहे.या गावाखाली अनेक लहान मोठ्या वस्त्या आहेत. त्यापैकी घोलापवाडी नावाची वस्ती आहे. सुमारें १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाबुराव घोलप यांचे पणजोबा श्री भागूजी घोलप येथे रहात होते. दुष्काळी परिस्थिती आणि शेती सावकाराने बळकावली होती. तरी कष्टाळू स्वभाव असल्याने त्यानी सावरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांचा लक्ष्मण नावाच्या मुलाला गहाण राहिलेल्या जमिनीची खंत होती.त्याने आपला मुलगा रामचंद्र याला शाळेत घातले. लक्ष्मणराव संरक्षण खात्यात कामाला होते. रामचंद्र यांना व्यायामाची फार आवड होती. त्यावेळीं गुलशे तालमीत बाबुराव वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच शिकत होते.छत्रपती शाहू महाविद्यालयात त्यानी नामांकित मल्ल म्हणून नाव मिळवले.त्यावेळी विष्णू पुऱ्यात हे कुटुंब रहात होते.तरुण रामचंद्र यांना पोलीस खात्यात नोकरी लागली. त्यानंतर त्यांची बदली वाफगाव , तालुका खेड येथे झाली.नोकरीचा बराच कालखंड येथेच गेला होता. तुकोजी होळकरांची जहागिरी, ग्रामदैवत भैरोबा व आदिशक्ती श्री मुक्ताबाई यांचे मंदिर असलेल्या गावात रामचंद्र रमून गेले होते.येथे त्यांनी थोडी शेती सुद्धा घेतली पत्नी उमाबाई यांची साथ अमूल्य होती त्या अतिशय धार्मिक होत्या. राजकीय स्थित्यंतराचा कालखंड होता. त्यावेळी १ फेब्रुवारी १९०४ रोजी पहाटे उमाबाईंच्या पोटी बाबुराव यांचा जन्म झाला.
बाबुराव लहानपण वाफगावातच गेले इ.४थी पर्यंत शिक्षण झाले.
अतिशय संस्कारक्षम कुटुंब बाबुराव हे उमाबाईचे तिसरे आपत्य होते. ते फार संवेदनशील होते त्यांना समाज होती.
बाबुराव यांच्या मोठ्या बहिणीचा विवाह जऊळके यागावत येवले यांच्या घराण्यात झाला बाबुराव फारच लहान होते.
पोलिस खात्यात नोकरी असल्यामुळे रामचंद्र यांची बदली पुण्याला झाली.त्यावेळी त्यांची बदली गव्हर्नर बंगल्यावर झाली. बंगल्याच्या आवारात राहण्याची सोय होती. तेथील चाळीत रामचंद्ररावांना एक खोली मिळाली.औंध येथील प्राथमिक शाळेत छोट्या बाबुरावला शाळेत इयत्ता ५वी मध्ये प्रवेश मिळाला.पुढे ७ वी पर्यंत त्यांचे शिक्षण येथेच झाले. त्यानंतर इयत्ता आठवीसाठी त्यांनी पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला. अध्ययन चालू असतानाच आईंची तब्येत बिघडू लागली आणि थोड्या दिवसात आईं उमाबाईंचे दुःखद निधन झाले. तरी आता घरात दुसरे बाईमाणुस नव्हते तरी सुद्धा त्यातून बाबुरावानी मार्ग काढला.वडील आता जमादार पदापर्यंत पोहोचले होते.आता ते निवृत्त झाले. पुण्यातील रास्ता पेठेत ते रहात होते. वाफगावाला शेतीकडे लक्ष देणे अत्यंत दुरापास्त झाले होते. बाबूराव व वडील रामचंद्र यांच्या पुढे दोनच प्रश्न होते एकतर शेती करणे किंवा शिक्षण पूर्ण करणे वडिलांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. वडिलांच्या कष्टाची जाण बाबुरावला होती.पुढे सन १९१८ मध्ये रामचंद्ररावांचे निधन झाले. आणि तो एक दुःखाचा डोंगर कोसळला पुढे सन १९२० मध्ये बाबुराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.पुढे फर्ग्युसन महाविद्यालयातून १९२४ मध्ये बी. ए.झाले.व याच शिक्षणाचा बाबुरावाना खूप फायदा झाला. गुरुवर्य बाबुरावजी जगताप यांच्या शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केले.
अध्यापनाचे काम करीत असताना पुढे शिकावे असे बाबुरावांना वाटू लागले.पुण्यातील लॉ कॉलेज मध्ये नाव नोंदवले व घारपुरे वकिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी अभ्यास सुरू केला.त्याच वेळी अनंतराव बळवंतराव थोरात आंबेगाव तालुक्यातील चांदोली हे त्यांचं गाव. त्याची कन्या भागीरथी (लक्ष्मीबाई)बरोबर सन १९२६ मध्ये बाबुरावांचां विवाह झाला.पुढे सन १९२७ मध्ये बाबुराव वकिलीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आणि शिरूर (घोडनदी) येथील कोर्टात त्यानी वकिली सुरू केली.तेथील कोर्टात १५ दिवस चाले व १५ दिवस तळेगाव ढमढेरे येथे चाले.नंतर १९३३ पर्यंत त्यांनी सासवड व पुणे येथील कोर्टात वकिली केली. पुढे ग्वाल्हेर, कोल्हापूर संस्थान हे पदवीधर तरुणांना सन्मानाची पदे देत तसेच बडोदा संस्थानचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी बाबूराव यांना निमंत्रित केले पण ते निमंत्रण त्यानी नम्रता पूर्वक स्वीकारले नाही.व सन १९३३ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डात चीफ ऑफिसर या पदावर काम करण्यास सुरुवात केली.
हे काम करताना ते भाड्याच्या घरात रहात होते. कसल्याही प्रकारचा बडेजाव नाही दिनांक १९ मे१९३३ मध्ये त्यांनी कामाला सुरूवातकेली.बोर्डाचा विकास कसा साधता येईल असे विचार ते करत असत.त्यांचा पगारहोता २०० /_रुपये होता. समाजभूषण शंकररावमोरे व आण्णासाहेबआवटे यांच्यासारखे अध्यक्ष यांच्यासारखे अध्यक्ष त्यावेळी बोर्डाला
लाभले.लोकल बोर्डाच्या कामापैकी आरोग्य,पाणीपुरवठा, धान्यपुरवठा,सार्वजनिक रस्ते,ही विशेष कामगिरी बजावावी लागे.ग्रामीण भागात असा नियम आहे की कोंडवाडा रजिस्टर त्यात किती जनावरे घातली त्याचा हिशोब असे कोंडवाड्यात जनावरांना कोंडल्यावर प्रत्येक जनावरापाठीमागे दंड आकारला जाई जर जनावरमालकाने जनावरे सोडवली नाहीतर दानापाणी यांची रक्कमवाढली जाई लोकल बोर्डाचे उत्पन्नाचे साधन होते. त्यावरील रजिस्टर वर पाहिलेले आंगठे यामुळेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना झाली.अवघाचि संसार सुखाचा करीन या संत वाचनाप्रमाणे सौ. लक्ष्मीबाई यांची साथ बाबूराव यांना होती.परंतु बाबूरावांचा थोरला मुलगा बाळासाहेब फार हुशार होता परंतू अचानक आलेल्या तापाने तो आजारी पडला आणि मृत्युमुखी पडला त्याचे वय फक्त १७ वर्ष होते.लगेच त्याचा मेट्रिकचा निकाल आला तर तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला.किती दुःख झाले असेल बाबूरावांना याची कल्पनाच करु शकत नाही. त्यावेळेस घोले रोडचे घर सोडून ते सदाशिव पेठेत माडीवाले कॉलनीत सन१९६० मध्ये भाड्याने राहायला आले ते शेवट पर्यन्त
सन १९६४ मध्ये सुशीला डॉक्टर झाली आणि डॉ.अमृतराव पवार यांच्या बरोबर लग्न झाले, नंतर प्रमिलाचे ही लग्न झाले.प्रताप लहान होता लक्ष्मीबाईंची प्रकृती ढासळली शेवटी कन्या सुशीला पवार यांच्या दवाखान्यात त्यांना नेण्यात आले.परंतु २४ जानेवारी १९७८ रोजी तिथेच त्यांचे दुःखद निधन झाले व घोलपसाहेबांना अजून एका दुःखाला सामोरे जावे लागले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व त्याची व्याप्ती पुढील भागात पाहू बहुजनांसाठी शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कार्य शिक्षण महर्षी बाबुराव घोलप साहेबांनी केले म्हणून त्यांना त्रिवार वंदन !!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ,🙏🙏🙏



श्री संत रामजीबाबा यांचे भक्त शाहीर महादू माळी यांची पोवाडा गीते

शाहिरांनी भक्ति विषयी काही रचना केली आहे. त्यामध्यें जागरण हा महत्त्वाचा भाग असून देवाचे आवाहन कसे असावे याचे आवाहन फार सुंदर आहे.देवाचे आवाहन करताना त्यामधे प्रत्येक गावात असलेल्या देवाचे प्रसंग त्यात त्यांनी कल्पकता पूर्वक आहे. हे फार महत्त्वाचे आहे.त्यातील प्रसंग नाट्यपूर्ण रितीने वर्णन केले आहे. त्यामध्यें भावपूर्ण भक्ती दिसून येत आहे.ती रचना सखोल अभ्यासकाव्यातिरिक्त शक्य नाही, यामधील विविध अलंकार व व्याकरण साधले आहे. अगाध भक्तीमुळे त्यांना शक्य झाले.त्यातील सुरुवात मध्य व अंत्य सुंदर रीतीने साधला आहे.भाषा ग्राम्य आहे शब्द वेगळे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे केवळ शब्दशः अर्थ नाही,तसेच पण अर्थाचा गाभा वेगळा आहे

🌹🌹🌹🌹||जागरण||🌹🌹🌹

मल्हारी मल्हारी देव तो मल्हारी
पिवळा मल्हार पिवळी पायरी
पिवळा मल्हार पिवळी जेजुरी
पिवळ्यात झेंड्यावरी देव मल्हारी
पालीच्या खंडोबात जागरण मांडिले दयाळा जागरणाला यावे.
लिंबागावच्या खंडोबाला जागरण मांडीले जगरणाला यावे
देहुच्या तुकाराम बुवांनी जागरण मांडीले जागारणाला यावे.
आळंदीच्या ज्ञानोबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
चिंचवडच्या मोरया जागरण मांडीले जागरणाला यावे.
पुण्याच्या पर्वती जागरण मांडीले जागरणाला यावे.
पंढरीचा विठोबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
देव कुंडलिकानी जागरण मांडीले जागरणाला यावे.
वाईचा गणपती जागरण मांडीले जागरणाला यावे.
द्रोणागिरी मारुती जागरण मांडीले जागरणाला यावे.
वाकडचा म्हातोबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
परभणीच्या भैरवनाथा जागरण मांडीले जागरणाला यावे.
जेजुरीचा खंडोबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
कडेपठार मल्हारी जागरण मांडीले जागरणाला यावे.
शिवरीच्या यमाई जागरण मांडीले जागरणाला यावे.
डोंगरची काळूआई.जागरण मांडीले जागरणाला यावे.
गणापुरी महादेवांनी जागरण मांडीले जागरणाला यावे.
तुळजापूरची भवानी आई जागरण मांडीले जागरणाला यावे.
कोल्हापुरी अंबिका. जागरण मांडीले जागरणाला यावे.
कोल्हापुरी लक्ष्मीआई. जागरण मांडीले जागरणाला यावे.
रत्नागिरी ज्योतिबा. जागरण मांडीले जागरणाला यावे.
उणीच्या सप्तशृंगी जागरण मांडीले जागरणाला यावे.
मुंबईच्या मम्हादेवी जागरण मांडीले जागरणाला यावे.
कोकणच्या वज्रेश्वरी जागरण मांडीले जागरणाला यावे. कोलठणच्या मल्हारी जागरण मांडीले जागरणाला यावे.
तळेगावचे डोळसोबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
वडगाव चा पोटोबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
चांदखेड चां मल्हारी जागरण मांडीले जागरणाला यावे.
चांदखेड चा रामजीबाबा जागरण मांडीले जागरणाला यावे.
चांदखेड चे कडेपठार जागरण मांडीले जागरणाला यावे.
चांदखेड च्या धर्मनाथा जागरण मांडीले जागरणाला यावे. चांद खेडच्या लक्ष्मी आईं जागरण मांडीले जागरणाला
कोऱ्हाल्याची वाघजाई जागरण मांडीले जागरणाला यावे.
देव वेताळानी जागरण मांडीले जागरणाला यावे.
चांदखेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेम्बर गड तुझी सोन्याची जेजुरी
चांद खेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गडाला नऊ लाख पायरी.

🌹🌹🌹||पद 1||🌹🌹🌹🌹
चांदखेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेम्बर गड तुझी सोन्याची जेजुरी,
मूळ पायाची कथा सांगतो गोष्ट ऐका खरी
भामर भीमा मिळोनी चालल्या चंद्र भागेच्या द्वारी
देहुमध्ये तुकाराम बुवा करंज बेटावरी
टाळ विणा मृदंग अखंड यांच्या बरोबरी||१||
आळंदी मध्ये देव ज्ञानोबा यांचे महत्त्व भारी
निर्जिव भिंत चालवली हे एक नवल परी||२||
चिंचवड मध्ये देव मोरया यांचे महत्त्व भारी
इंग्रजांनी मौत भरुनी नेले देवाच्या द्वारी||३||
जाई मोगऱ्याच्या कळ्या करोनी फिरून लावल्या माघारी
वाकड मध्ये देव म्हातोबा यांचे सत्व भारी ||४||
जांभूळकराला हाका मारली गळ लावा बरगडी
कल्हार्याची सून बाई नाचे काच्यावरी||५||
मांगानीचा टीलां घेऊनी देव फिरले माघारी
पंढरी मध्ये देव विठोबा उभे विटेवरी||६||
देव पुंडलिकाचे देऊळ गंगेच्या महा तिरी
जेजुरीमध्ये चोरुन भंडार पडे राव बानाई वरी||७||
राम लक्ष्मण दोघे बंधू राव छत्रगुणी(भरत शत्रुघ्न)
खेळ खेळू होम मांडीयला हा एक नवल परी||८||
त्या होमातूनी घोडा निघाला साय सांगेन तरी
उजवा पाय उचलीता हळदीचे झाड त्याच्या समोरी||९||
तोडी झाडाचे पान भंडार फेके राव मुलखावरी
रामजी बाबांनी भक्ती केली जन्म गेला तरी ||१०||
चांद खेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गड तुझी सोन्याची जेजुरी
चांदखेड नगरी अजाब गुजरी नांदे देव मल्हारी
पाली न पेंबर गडाला नऊ लाख पायरी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



श्री संत रामजीबाबा यांचे भक्त शाहीर महादू माळी यांची पोवाडा गीते भाग 0१

The history of Chandkhed village is very old. Many great personalities have left their mark in this village. Many great things have happened in the life of Ramji Baba in this village like Shri Sant Ramjibaba, the great deity of this village. We have to admit this. The small temple between Mahadu Mali Shri Khandoba Devasthan Nimgaon and Khandoba Devasthan Jejuri in Chandkhed.The character of Ramji Baba that we read today is available today in the form of Powada. That is to say, he wrote very well about 150 years ago when there was no writing material of any kind.
As Vyas wrote in the Mahabharata. So Shri Krishna, the Pandavas, as you understand, played the role of Vyas.
We are going to study. The writing style is traditional.This type of writing is done according to the traditional rules. Shri Ganesha is remembered first
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

चांदखेड गावाचा इतिहास तसा फारच जुना आहे. या गावामध्ये अनेक महान विभूती आपल्या कार्याचा ठसा ठेऊन गेल्या आहेत.हे या गावाचे विशेष ,श्री संत रामजीबाबा हे महान दैवत तसा गावामध्ये रामजी बाबांचे जीवनात अनेक महान गोष्टी घडल्या आहेत.हे आपल्याला मान्य करावेच लागेल.परंतु रामजी बाबांचे जीवन चरित्र ज्या महान मानसाने आपल्या समोर ओवीबद्ध केला .पोवाडा स्वरूपात मांडला ते म्हणजे चांदखेड येथील महादू माळी श्री खंडोबा देवस्थान निमगाव व खंडोबा देवस्थान जेजुरी यांचा मधील त्यांचे छोटेसे मंदिर आहे .आज आपण जे रामजी बाबांचे चरित्र वाचतो ते त्यानी पोवाड्याच्या स्वरूपात आज उपलब्ध आहे.म्हणजे सुमारे १५० वर्षापूर्वी कोणत्याही प्रकारचे लेखन साहित्य नसताना सुद्धा उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यानी अतिशय उत्कृष्टपणे लेखन केले आहे.
व्यासांनी जसे महाभारतात जे लेखन केले.त्यामुळे श्री कृष्ण ,पांडव आपणास समजले तशी त्यानी व्यासांची भूमिका पार पाडली त्यामुळे कृतज्ञतापूर्वक ग्रामस्थांनी त्यांचे मंदीर बांधले आहे व त्यांच्या विषयी आदर व्यक्त केलेला दिसतो.आज आपण त्यांच्या लेखनाचा
अभ्यास करणार आहोत. लेखन पद्धती पारंपारिक आहे पूर्वी मेळे ,पोवाडे गायले जायचे त्या पद्धतीचे आहे.यामध्ये त्यानी तत्कालीन नियम सुद्धा सांगितले आहे आज आपण जी पारंपरिकता मानतो ती त्यांच्या लिखाणामुळे.यामध्ये त्यानी जो स्थळ काळाचा उल्लेख केला आहे ते आपण पुढच्या भागात पाहू. लिखाणात गोपनीयता सुद्धा आहे. मुद्दाम वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत.श्रध्दा असेल तरच अर्थ समजतो.

अशाप्रकारचे लेखन पारंपारिक नियमाला अनुसरून केले आहे.अगोदर श्री गणेशाचे स्मरण आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री रंग झाले प्रसन्न श्री रंग झाले प्रसन्न
श्री रंग झाले प्रसन्न गणपती सभेसी येऊन
गण सभेमधी काय झाले बादशाही मुजरे केले
येऊनी साभेमधी बसले रांगराज बहु लोटले .....
तुरे गजानन गणपती कैलास तुमच्या हाती
बैठका दरवाजावर ती कैकाळ तुला रे कापती
वंदितो तुमचे चरण गणपती सभेसे येऊन........

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
||गण २||
महाराजा मल्हारी रे तुजविण कोण तारी
आदि ठिकाण पेंबर देवानी घेतला अवतार
वर उधळतो भंडार मुखी येळकोट मल्हार ||१||
देव नांदी वरती स्वार पुढे दिवसाचा भार
वर उधळतो. भंडार मुखी येळकोट मल्हार ||२||
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌

||गण३||
शिव पार्वतीच्या वंदना वंदना गणराया तुला वंदना
पहिले नमन माझे गणपतीला गणपतीच्या शारदेला
दुसरे नमन माझे शंकराला शंकराच्या पार्वतीला
तिसरे नमन माझे खंडोबाला खंडोबाच्या म्हाळसाला
चौथे नमन माझे भैरवाला भैरवाच्या नागेश्वरीला
पाचवे नमन माझे विठ्ठलाला विठ्ठलाच्या रुक्मिणीला
गणराया तुला वंदना गणराया तुला वंदना
गणराया तुला वंदना.........
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
||गण४||
आरती करोनी आरती, ओवाळीला शारदा पतीत मंगल मूर्ती
आरती करू पंच प्राणाची, ज्योती वळू अभिमानाची
नाचत आले गणपती धरून ,मज हाती पतीत मंगल मुर्ती,
हाती धरून पुष्पमाळा शिनंदाचा घालू गला
हरिभाऊ तुझे गुण गाती ,धरून मज हाती पतीत मंगल मुर्ती,
आम्ही आदिनाथ होऊन , सभामंडपी आमुच्या गण.
भव भक्ती तुझे गुण गाती ,धरून मज हाती पतीत मंगल मूर्ती
गण...............
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
||गण ५||
प्रथम गण नमिले मल्हार म्हाळसा सुंदरी
धावून आले माझे कैवारी
चौक भरला भंडाराचा राजा आला गड जेजुरीचा
मनोरथ फिटला माझ्या मनाचा
देवा तुझ्या नामाचा लाविल्या गती
म्हाळसाच्या पतीन लवकर येई हो
मार्ग लक्ष्मीच्या हाती हो मार्ग लक्ष्मीच्या हाती
तिशी तू जावे काकुलती हो तीशी तू जावे काकुलती
उ भा राहुनी सभा मंडपात तुम्हाशी जोडून दोन्ही हाय
अहो म्हाळसाच्या पती न लवकर येई हो.



राजा राममोहन रॉय Raja Rammohan Roy

आपल्या भारत देशात अनेक विभूती जन्मल्या व त्यांनी आपल्या देशाला एक आदर्श घालून दिला तो पण कायम स्वरूपाचा ,आपल्या नवीन विचारांनी देश समृद्ध केला .तोही न विसराण्या सारखा. अशापैकीच एक म्हणजे राजा राममोहन रॉय होत राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ मध्ये ब्राम्हण समाजात बंगाल राज्यातील हुगली जिल्हयात अरंभग तालुक्यातील राधानगर इथं झाला. त्यांच्या परिवारात आपल्याला जातीय विभीन्नता बघायला मिळते त्यांचे वडील रमाकांत वैष्णव धर्माचे होते ,तर आई तारिणीदेवी शिवैत परिवाराच्या होत्या.वडील परंपरा प्रेमी होते तर राम मोहन नवं विचारानी प्रभावित झालेले. असामान्य व्यक्तिमत्व होते. भरपूर वाचनामुळे विकसित बुद्धीमत्ता होती.समाजाकडे पाहण्याचा वेगळा असा दृष्टिकोन होता.ते आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडत.त्यामुळे त्यांचा प्रभाव सहजपणे समाजावर पडला.
त्याकाळात विवाह प्रथा फार वेगळी होती.लहान वयातच मुलांची लग्न होत होती त्या प्रमाणे, राजा राममोहन रॉय यांचा विवाह झाला होता.त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यु बालपणातच झाला.नंतर त्यांचे दुसरे लग्न झाले त्यांच्या दुस-या पत्नीपासुन त्यांना दोन मुलं झाली सन १८०० मध्ये राधाप्रसाद आणि सन १८१२ मध्ये रामप्रसाद त्यांच्या दुस-या पत्नीचा मृत्यु १८२४ मध्ये झाला .त्यांची तिसरी पत्नी देखील जास्त काळापर्यंत जिवंत राहीली नाही, त्यांचे प्रारंभीक शिक्षणात बरेच चढ-उतार आले असे सांगतात की राम मोहन यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले, तिथे त्यांनी बंगाली, संस्कृत, आणि पार्शियन भाषेचे ज्ञान प्राप्त केले, त्यानंतर मदरसा येथे त्यांनी पार्शियन आणि अरेबिक भाषेचे ज्ञान प्राप्त केले तत्पश्चात हिन्दु साहित्य आणि संस्कृत चा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले.तेथे गेल्यानंतर त्यांनी वेदउपनिषदांचा देखील अभ्यास केला होता. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी विशिष्ट अशी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते तिबेटला गेले.भारतीय ग्रंथ आणि संस्कृती या विषयी त्यांनी सखोल अभ्यास केला होता.
प्रखर आत्मविश्वासाने त्यांनी अध्ययन केले.त्याचा परिणाम त्यांच्या विचारातून दिसून येतो.
मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम ब्रह्मपत्रिका नावाचे वृत्तपत्र सुरु केले. त्यानी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती.आत्मज्ञान श्रेष्ठ आहे परमात्मा एकच आहे असे त्यांचे विचार होते त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे मतभेद झाले होते.
राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, कर्मकांडाला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला.देव कोणत्याही मूर्तीत नाही त्यासाठी जे अवडंबर माजविले जाते हे त्यांना मान्य नव्हते त्यामध्यें अंधश्रद्धा पसरविली जाते आहे जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुणआहे , निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. जीवन विषयक सत्य त्यांनी जाणले होते भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची अपेक्षा होती. भारताला योग्य अशी दिशा देणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी पुढे होऊन सन १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यानी पाश्च्यात्य अशा ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. भारतातील जुन्या प्रथा, तशाच परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था कशी असावी यासंदर्भात लेखन वृत्तपत्रातून करण्यास सुरुवात केली.त्यांनी दिनांक ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर दिनांक १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले.विविध भाषेमध्ये लेखन करणारे तत्कालीन प्रभावी लेखक होते.विश्वातील महत्वपुर्ण धर्मग्रंथ मुळ रूपात वाचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते यामुळे सगळया महत्वपुर्ण धर्मग्रंथाची ते तुलना करू शकले होते , आणि स्वतःचे मत प्रखरपणे मांडले विश्वधर्माची त्यांची धारणा कोणत्याही सिध्दांतावर आधारीत नव्हती तर विभिन्न धर्माच्या गंभीर ज्ञानावर आधारीत होती त्यांनी वेदाचे आणि उपनिषदाचे बंगाली भाषेमध्ये भाषांतर सुध्दा केले, वेदांतावर इंग्रजीत लिखाण केल्याने युरोपात आणि अमेरिकेत त्यांचे बरेच नाव झाले आणि कौतुकही झाले ही विशेष उल्लेखनीय बाबआहे.भारतातील नवीन तरुणांना योग्य दिशा मिळावी उच्च शिक्षणाला चालना मिळावी म्हणूनच त्यांनी सन १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.
सतीप्रथा बंद करणे ही राजा राममोहन रॉय यांच्या जीवनातील सर्वात मोठे कार्य होते. स्रीयांना तत्कालीन कर्मठ कट्टरवादी समाजाने अमानुष वागणूक दिली जात होती. पतीच्या निधनानंतर तिला सती जावे लागत होते. स्वतः ला जिवंत जाळून घेणे केवढे अमानूष होते याची कल्पनाच करवत नाही. स्री अबला असून तिच्यावर होणारा अन्याय फार भयानक आहे ,हे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी ही कुप्रथा सरकार व्दारा बंद करून याला दंडनीय अपराध घोषीत केला.या अमानवीय प्रथेचे त्यांनी जोरदार खंडन केले वृत्तपत्रातून आणि सभांमधून या आंदोलनाने त्याकाळी खूपच जोर धरला होता.ही अभिनंदनीय बाब होय.यासाठी त्यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा केली नाही.त्यांच्यावर हल्ले झाले त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग
यांनी १८२९ मध्ये सतीची चाल बंद केली.कट्टरपंथीय लोकांनी सतीप्रथेच्या समर्थनासाठी विनंती पत्र दिले. त्यावेळी राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथे विरुद्ध विनंती पत्र दिले आणि प्रिवी काऊंसिलने सती प्रथेच्या समर्थनार्थ असलेले पत्र फेटाळले व राममोहन रॉय यांना यश मिळाले व सतीची चाल कायमची बंद झाली.आणि पिढ्यानपिढ्या स्रीयांवरिल अन्याय बंद झाला. सती प्रथा संपल्यामुळे राजा राममोहन रॉय मानवतावादी सुधारकांच्या रांगेत आले . त्यानी भारताला योग्य दिशा दर्शवली परंतु त्यांना काही प्रमाणात यश आले. सतीची चाल म्हटले तर लगेच राजा राममोहन रॉय यांचे नाव नजरे पुढे आल्याशिवाय रहात नाही आणि अशा या महान विचारवंताचां दिनांक २७ सप्टेंबर १८३३ ला इंग्लंड मध्ये यांचा मृत्यु झाला.अशा या मानवतावादी महान विचार वंताला त्यांच्या जन्मदिनी मानाचा त्रिवार मुजरा.राजा राम मोहन रॉय गेले असले तरी त्यांचा विचार त्यानी आपल्या समोर ठेवला आहे. त्याचे जर संवेदनशीलपणे वाचन केले तरी एक प्रभावी मार्ग आणि समाजातील सत्य समोर दिसेल म्हणूनच हा मी केलेला छोटासा प्रयत्न,जय हिंद ,जय महाराष्ट्र.



मल्हारराव होळकर malhaarrao holkar

मल्हारराव होळकर
(जन्म १६ मार्च १६९३ मृत्यू २०मे १७६६)

मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर समाजात झाला होता.मेंढपाळ म्हणजे भटकंती व त्यांना सांभाळणे मेंढपाळ कुटुंबातला एक भाग होता. त्यांचे वडील म्हणजे खंडोजी वीरकर चौगुला त्यांचा व्यवसायही मेंढपाळ हा होता.अशाच भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला,या त्रासाला कंटाळून होळ गाव सोडले व म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे राहिले.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. त्याच्या खेळात त्याचे भविष्य घडत होते.जेथे तळ पडेल तेथे मुले असे खेळ खेळत लाठी काठी ची लुटूपूटू च्या लढाईत नवीन जीवनाची जडन घडण होत होती.नवीनच क्रांती त्यांच्या जीवनात होणार हे जगाच्या नियंत्याने ठरविले होते.त्यात त्यांना यशही येत होते.ते फार धाडसी होते.मुत्सद्दी होते. त्यामुळे ते यशस्वी होत गेले.
मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते.अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले होते.
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली.मुळातच शूर असल्याने शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटले नाही.अजोड पराक्रमामुळे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीच्या खंडोबाच्यावर त्यांची भक्ती होती आणि आणि या श्रद्धेमुळे व जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. त्याच प्रमाणे नियमित पूजा झाली पाहिजे याची व्यवस्था केली.मंदिराचे बांधकाम करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला.म्हणूनच त्यांनी तिकडे लक्ष देण्याचे ठरविले. आपल्या परिश्रम पूर्वक केलेल्या कामामुळे उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, छत्रपती शाहू महाराजांचा तो काळ होता तत्कालीन मातब्बर सरदार  राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. छत्रपती शिवाजमहाराजांच्या अदर्शावर गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा वाढला होता.आता खंडोजीचे लग्न करावे असे त्यांना वाटू लागले.म्हणूनच इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. खंडेराव होळकर यांच्या १२ राण्या होत्या.खंडेराव सुद्धा लढवय्या होता.१७ मार्च १७५४मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले.घरातील कर्तृत्ववान मुलगा गेल्याने त्यांना फार मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागले. आपल्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याचे दुःख न पेलण्या सारखे असते. एवढ्या प्रचंड मोठी कामगिरी बजावली असून शून्यातून सर्व निर्माण करूनही ते दुःखी होतात. अहिल्याबाई अतिशय धार्मिक व परंपरप्रेमी होती पतीवरीला प्रेमामुळे सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, अहिल्या खूप हुशार होत्या कर्तबगार होत्या हे मल्हारावांनी ओळखले होते. आता तेवढी आशा त्यांना होती.परंतु बाकी अकराजणी राण्या सती गेल्या. केवढे भयानक दृश्य असेल याची कल्पना करवत नाही.पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यामध्ये प्रामुख्याने ते अग्रभागी राहिले रघुनाथराव पेशवे असोत किंवा कोणाच्याही नेतृत्वालाच त्यांनी प्राधान्य दिले त्यांना मल्हाररावांनी मदत केली ती न विसरण्यासारखी आहे. मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. सामंजस्याने काही प्रश्न सोडवावे असे त्यांना वाटू लागले परंतु त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारावांनी गनिमी काव्याचे धोरण स्वीकारून अब्दालिशी लढावे असे त्यांनी भाऊसाहेबांना सांगितले परंतु पुण्यावरून आलेली प्रचंड सैन्यावर भाऊसाहेबांना विश्वास वाटत होता शिवाय इतर मराठा सरदारही येऊन मिळाले होते आणि म्हणूनच मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. १३ मार्च १७६0 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने तसा अब्दालीने तहास तयारी दर्शवली परंतू नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. शेवटी युद्धास सामोरे जावे लागले.या युद्धात अब्दालीला तसेच मराठ्यांना ही फार मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले.तरूण वर्गाची फार हानी झाली.१४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते .
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला मराठ्यांचा दाबदबा त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केला होता. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. ते केवळ यांच्या कर्तृत्वाने होय.अब्दालीच्या तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. दिनांक २७ मार्च १७५२ होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता हे दिसून येते.आता मराठ्यांचे साम्राज्य संपूर्ण देशात वाढत आहे हे केवळ मल्हाररावांनी आपल्या एकनिष्ठता दाखवली म्हणून घडले होते.जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. होळकरांचे शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती ,असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले. यामध्ये त्यांची सर्व समावेशकता दिसून येते आपले दुःख बाजूला ठेऊन त्यांनी शिंदेशी मैत्रीची भावना कायम ठेवली. पानिपत च्या पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या व मल्हाररावांना दुसऱ्या दुःखद घटनेमुळे ते आणखीनच खचले. मल्हाररावांनी अहील्याबाईंना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ अहिल्याबाई राज्यकारभारात हुशार होत होत्या हे एक प्रमुख समाधान त्यांना वाटत होते. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.पानिपतच्या युद्धामध्ये झालेली हानी न विसारण्या सारखी आहे हे त्यांनी लक्षात घेतले.पुन्हा परत आपले मतभेद विसरून सर्व सरदारांना एकत्र आणून मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या बरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना दिनांक २० मे १७६६ रोजी आलमपुर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. अशाप्रकारे शेवटच्याश्वासापर्यंत ते मराठेशाहीत एकनिष्ठ राहिले आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. त्यांच्या सूनबाई आहिल्याबाई त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांचे स्मारक उभारले.असे होते मल्हारराव होळकर . मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. पेशव्यांशी ते कायम एकनिष्ठ राहिले अशा या थोर कतृत्ववान सरदारांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार न विसरण्यासारखे आहे.



विष्णुशास्त्री चिपळूणकर vishnushasri chipalunkar

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे १८५० मध्ये पुण्यात झाला पुणे तिथे ज्ञानाचे भांडार अशा आदर्श कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णशास्त्री होते घरातच ज्ञानाची गंगा वहात होती.त्यामुळे एका नव्या आदर्शाची जडण घडण झाली.लहान वयातच त्यांना वाचनाची आवड होती.त्यामुळे अनेक ग्रंथांचे वाचन व अभ्यास झाला. गद्य लेखनाचा त्यांना व्यासंग होता .नवीन व आधुनिक पद्धतीचे त्यांचे लेखन अधिक प्रभावी होते.त्यामुळे त्यांना ,आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जात.त्यांच्या लेखनाची छाप आजही जनमानसावर आहे.गद्य लेखन त्यांच्या अगोदर पासून होत होते. परंतु त्यांनी त्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या नामवंत विद्यार्थ्यांपैकी ते एक होय.सन १८७२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा पुण्याच्या डेक्कन कॉलेजा तून ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर सन १८७२ मध्ये त्यांनी अगोदर पुणे व नंतर रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून१८७९ पर्यंत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.  विष्णुशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री त्याकाळातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होते .त्यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता. इंग्रजीचा अभ्यास असल्याने इंग्रजी साहित्याचे जाणकार होते , रसिक, विद्वान आणि चतुरस्त्र मराठी लेखक असल्यामुळे त्याचा परिणाम विष्णुशास्त्री यांचा व्यक्तिमत्त्वावर झाला.विष्णुशास्त्र्यांनाही लेखनवाचनाची गोडी लागली. सन १८६८ मध्ये वडीलांनी चालविलेल्या शालापत्रक  ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला व त्या लेखनाचा प्रभाव संपूर्ण पुण्यात जाणवू लागला व त्यानंतर काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले. ब्रिटिशांचे ते राज्य होते त्यामुळे त्यांच्या लेखनाला पायबंद बसला इंग्रज सरकार व त्याविरुद्ध जनजागृती ते करत होते ते मात्र तेथील इंग्रज सरकारला सहन होणे अशक्यच त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी ह्यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक  सन १८७५ मध्ये बंद पडले . सरकारी नोकरीत असतानाच निबंध लेखनाची आवड असल्याने त्यांनी निबंधमाला, हे सुप्रसिद्ध मासिक काढले सात वर्षाच्या कालखंडात विष्णुशास्त्रीनी सुमारे ८४ अंकांचे लेखन अप्रतिम केले आहे.सन १८७८ मध्ये त्यांच्या लेखनाला समविचारी असे ज. बा. मोडक आणि का. ना. साने ह्यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह  हे मासिक सुरू केले आहे आपल्या देशाला फार मोठी साहित्यिक संस्कृती आहे.त्यांमध्ये अनेक पिढ्यांपासून लोकांनी हे काव्य संग्रह लेखन समृद्ध केले आहे.ते समाजापुढे येणे आवश्यक आहे म्हणून आपल्या देशातील लोकांनी रचिलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे त्यांनी ठरवले कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस  ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक  ह्या नावाने दुसऱ्या आवृत्ती १८९१मध्ये प्रसिद्ध केले आहे ,हे मात्र अमूल्य आहे ह्या निबंधानी काव्यसमीक्षेच्या पाश्चात्त्य दृष्टीला महत्त्व दिले व प्राचीन कवींचा काल, कविता आणि कला ह्यांच्या मीमांसेत ऐतिहासिक दृष्टी वापरली.जनजागृती करणे हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता. तथापि ह्या मासिकावर विष्णुशास्त्र्यांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते.हे विशेष होय. देशामध्ये ब्रिटिशांचे राज्य असल्याने शैक्षणिक जागृती होणे आवश्यक होते त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले व १८८० मध्ये नव्या पिढीच्या मनावर शैक्षणिक जागृती देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ही ख्यातनाम शाळा स्थापन केली. या काळातत्याच वर्षी कडव्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी दोन वृत्तपत्रे – केसरी  हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी-त्यांनी काढली. परंतु प्रिंटिंग होणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले या साठी छापखाण्याची गरज होती ती पूर्ण केली.या कामाशिवाय चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबखाना ह्यांसारखे समाजशिक्षणोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यामुळे शालापत्रक, निबंधमाला, केसरी   इ. नियतकालिकांतून विष्णुशास्त्र्यांनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व ह्यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रणस्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय आहेत.
स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. ह्या तिन्ही संदर्भांत सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा ह्यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतवणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. तो साधण्यासाठी सालंकार, संस्कृत काव्यशैली आणि ॲडिसन, मेकॉले ह्या इंग्रजी निबंधकारांचे डौलदार निबंधलेखन ह्यांच्या संस्कारांतून घडलेली समर्थ आणि प्रभावी गद्यशैली त्यांनी आपल्या लेखनात वापरली. स्वमताविषयी तारुण्यसुलभ अभिनिवेश आणि परमतखंडनातील धारदार उपहास-उपरोध, सुभाषितांचा योग्यप्रकारे मार्मिक उपयोग, पल्लेदार वाक्यरचना ही त्यांच्या शैलीची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. ह्या लेखनाने मराठी गद्याला प्रौढता आणली अनेकांना राष्ट्रभक्तीची, इतिहाससंशोधनाची आणि साहित्यसेवेची प्रेरणा दिली. राजकीय वा सामाजिक चळवळीत विष्णुशास्त्री प्रत्यक्ष पडलेले दिसत नाहीत आपला परंपराभिमानी राष्ट्रवाद जोपासण्याच्या भरात प्रार्थनासमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज, आंग्लशिक्षित सुधारक मंडळी, ख्रिस्ती धर्मोपदेशक ह्यांना सरसकट परधार्जिणे ठरवून त्यांनी जी प्रखर टीका केली, त्यांच्या या लेखनात तत्कालीन व्यापक सामाजिक जाणिवेचा अभाव होता. हे आता कालौघाबरोबर स्पष्ट झाले आहे. दिनांक १७ मार्च १८८२ पुणे येथे ते निधन पावले.त्यावेळी त्यांचे वय अवघे ३२ होते.विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे तैलचित्र गोपाळ देऊसकर यांनी केलेले तैलचित्र अभूतपूर्व आहे.ते पाहण्याचा योग आला एका महान कलाकाराने एका विचारवंतांचे केलेले चित्र फारच सुंदर आहे.त्याच प्रमाणे टिळक रोड येथे त्यांचे एक स्मारक उभारण्यात आले आहे.


संदर्भ : १. चिपळूणकर, ल. कृ. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांचे चरित्र, पुणे, १८९४.

            २. जोशी, लक्ष्मणशास्त्री, आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत , पुणे,  १९७२. 

            ३. बुद्धीसागर, मा. ग. संपा. चिपळूणकर लेख-संग्रह, नवी दिल्ली, १९६३.

            ४. माडखोलकर, ग. त्र्यं. चिपळूणकर काल आणि कर्तृत्व, अमरावती, १९५४.                  

अदवंत, म. ना.



उद्योगपती जमशेदजी टाटा

आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले.त्यांच्या कर्तृत्वाने तरुण वर्गाला स्फूर्ती येईल नवीन भारत यांनी घडवला व एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे ते म्हणजे जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. त्यावेळी मुलांची लग्न लहान वयातच होत होती त्यामुळेच जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.भारतीय माणसाचे हे एक अभूतपूर्व यश आहे.ज्या देशाने भारतावर १५० वर्ष राज्य केले त्याच देशाचे संसद सदस्य मिळणे ही आपल्याला अभिमानाची बाब आहे.त्यांनी स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. जमशेदजी मुळातच कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे शैक्षणिक कारकीर्द अत्यंत विलक्षण होती.१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. नुकतेच १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते.(राणी लक्ष्मबाईंनी,तात्या टोपे,नानासाहेब पेशवे,मंगल पांडे यांनी या क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिले होते) ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.व तेथील व्यापारा विषयी अभ्यास केला.व व्यावसायिक ध्येय निवडले १८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली.१८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.१८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली.
त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात वेगळेपण सिद्ध केले.व त्यात ते यशस्वी झाले.प्रत्येक माणसाचे एक ध्येय असते तसेच
त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. स्वयंपूर्ण असे ते एकमेव हॉटेल होते. उच्चभ्रु संस्कृतीला प्रेरणा देणारे ते आदर्श हॉटेल होते.त्यावेळी भारतात इन्लंड वरून आलेल्या लोकांसाठी हॉटेल असायची त्यात भारतीय माणसास प्रवेश नसायचा तो भारतीय कितीही श्रीमंत असलातरीही ते पाहिल्यावर असे हॉटेल बांधायचे की त्यात परदेशी लोकांची सोय करायचीच परंतु आपल्या देशातील लोकांना त्यात प्रवेश असेल त्या सर्व सुखसोयींनी युक्त असावे आणि त्यांचे ते स्वप्न ताजमहाल च्या रूपाने साकार झाले.नंतर मात्र ती ब्रिटिश हॉटेल्स मात्र बंद पडली. स्टीलच्या उत्पन्नात त्यांनी उंच भारती घेतली.ती म्हणजे उत्कृष्ट स्टील निर्मिती केली ती म्हणजे श्रेष्ठ अशी टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली. व्यावसायिक वृत्ती प्रमाणेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपले कार्य सिद्ध केले आहे ते म्हणजे बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था स्थापन केली.त्यामुळे शिक्षणाविषयी असलेली जाण यातून स्पष्ट होते. भारतातील लोकांच्या गरजा त्यांनी ओळखल्या होत्या.त्यानुसार शिक्षणाची दारे त्यांनी उघडली.भारताची मुख्य गरज म्हणजे वीज निर्मिती यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यातूनच टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी निर्माण करून आपली योग्यता सिद्ध केली.अपरिमित कष्ट,अधिक कार्यक्षमता,उच्च ध्येय,कामासाठी अधिक वेळ,परदेश वाऱ्या यामुळे त्यांची प्रकृती खालावली
१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदर्भ................,............
आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं

दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:

टाटायन-गिरीश कुबेर. टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक.

प्रकाशन-राजहंस प्रकाशन.



संत मुक्तबाई Saint muktabai

संत मुक्ताबाई यांचा जन्म सन १२७९ मध्ये आपेगाव,येथे झाला.
संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण म्हणजे मुक्ताबाई. चांगदेवाने जेव्हा संत ज्ञानेश्वरांना कोरा कागद पाठवला त्या वेळी मुक्ताबाई नी चांगदेवाला इतके वर्षे जागून ,कोरा तो कोराच राहिला असे म्हटले.पुढे तो मुक्ताबाईचा शिष्य झाला. समाजाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ज्ञानदेव खिन्न झाले.खोलीचे दार लावून घेतले.तेव्हा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून मुक्ताबाई ने म्हटलेले ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. ज्ञानदेवांच्या भेटीला एकदा संत नामदेव आले त्यावेळीं त्यांनी त्यांचे फारच कौतुक केलेआहे.ते म्हणतात लहानशी मुक्ताबाई जैशी सनकांडी| केले देशोधडी महान संत|| आपले अवतार कार्य संपले म्हणून संत ज्ञानदेव व संत सोपानदेव यांनी समाधी घेतलीत होती.तेव्हा एकत्र आलेल्या संतांचा मेळा तुटला.सर्व संत यांचे एकत्र येणे अवघड झाले. त्यावेळी मुक्ताबाई यांना फार वाईट वाटले.त्या दुःखी झाल्या.आता आपण शरीर रक्षू नये असे तिला वाटू लागले. समाधी विषयी सारखे विचार तिच्या मनात येऊ लागले. याविषयी निवृत्ती दादाला अनेकदा सांगितले आणि वैशाख व.दशमी (सन १२९७)या दिवशी उन रणरणत होते.संत निवृत्तीनाथ यांनी त्यांना ब्रम्हज्ञानाची अनुभूती दिली. आकाशात विजेचा प्रचंड कडकडाट झाला.आणि मुक्ताबाई त्यामध्ये गुप्त झाली जवळच असलेल्या एदलाबाद येथे त्यांचे मंदिर आहे.त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे
आहे.त्यांच्या समाधी विषयी अनेक अख्यायिका आहेत.तिला आदिशक्तीचे स्वरूप म्हणून गौरविले जाते.प्रपंच्यातून निवृत्त व्हायचे असेल तर ज्ञानाचा सोपान आहे त्यामुळे मुक्ती मिळते.मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.असे सांगितले जाते.
अभंग.
मुंगी उडाली आकाशी|
तिने गिळीले सूर्याशी||
थोर नावलाव जांला|
वांझे पुत्र प्रसवला||२||
विंचू पाताळाशी जाय|
शेष माथा वंदी पाय||३||
माशी व्याली घार झाली|
देखोनी मुक्ताई हांसली||४||

संत मुक्ताबाई



Balashasri Jambhekar बाळशास्त्री जांभेकर

Balshastri Jambhekar Memorial Day
Balshastri Jambhekar was born 1810 at Pombarle in Konkan .At an early age, he was fluent in Marathi and Sanskrit.Later, after coming to Mumbai, he mastered English and became fluent in Gujarati, Persian and Kannada. He was a professor at Elphinstone College, Mumbai. He wrote many scholarly essays.In January 1862 at the age of 22 he started the first Marathi newspaper, Darpan.Aiming at conversion, he started the purification movement. Shripati Sheshadri, a boy who converted to Christianity, was purified and converted back to Hinduism.He wrote childrens grammar, proverbs, anthologies, history of Hindustan, history of England, history of English states of India, history of Hindustan.Maharshi Dadabhai Naoroji and Kerunana chatre were made under his guidance.He died on 17 May 1846. A polite salute to his sacred memory



संत जनाबाई

संत जनाबाई
महाराष्ट्रातील एक महान संत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे त्यांचा जन्म झाला.वडिलांचे नाव करंड होते तर आईचे नाव दायाबाई होते.आई लहानपणीच वारल्याने वडिलांनी जानाबाईंना दामाशेट्टी च्या घरी ठेवले.तेथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेवांना ती सापडली.अशी पण एक आख्यायिका आहे. तीने संत नामदेवांना आपले गुरू मानले.त्याच प्रमाणे नामयाची दासी जनी, या नावाने तिने अभंग रचना केली.त्यांचे सुमारे साडे तीनशे अभंग प्रसिद्ध आहेत.त्यांनी काव्य ग्रंथही लिहिले.तिची काव्य रचना साध्यापद्धतीची असून रसाळ आहे.त्याचप्रमाणे काळजाचा ठाव घेते. त्यांची विठ्ठलावर भक्ती होती.लोक सांगतात त्यांच्या भक्तीमुळे विठ्ठल सर्व कामात हातभार लावीत असे.जनाबाई बरोबर त्याने दळण दळायला मदत केली अशी अख्यायिका आहे.संत जानाबई या समाजाचा एक आध्यात्मिक आदर्श आहे.त्यांनी स्री जातीचा भक्तीला व अभंग रचने विषयी मार्ग दाखविला आहे.सन १३५० मध्ये त्या अनंतात विलीन झाल्या .
गंगा गेली सिंधुपासी | तेणे अव्हेरीले तिसी||तरी सांगावे कवणा |ऐसे बोलावे विठ्ठला ||
जळ कोपे जळचरा |माता अव्हेरी लेकुरा ||जनी म्हणे शरण आले |अव्हेरीता ब्रीद गेले||
संत जनाबाई



धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी राजे.
महाराष्ट्रात अनेक महान राजे होऊन गेले.त्यांनी या महाराष्ट्राला अतिशय आदर्श बनविले आहे.त्यांच्या या महान कर्तृत्वाने आपल्या समोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज
दि.१४ मे १६५६ या शुभदिनी किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ महाराणी सईबाई या त्यांच्या आई होत. सईबाईंच्या प्रकृती अस्वस्त्थतेमुळे संभाजी राजांच्या दुधाची हेळसांड होऊ लागली.ही जबाबदारी कापूरहोळच्या गाडे पाटलांची सून धाराऊ यांनी पार पाडली . जन्मानंतर अवघ्या दोन वर्षातच शंभुराजे मातृत्वाला पोरके झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षातच त्यांना युद्धकलेचे व बौद्धिक शिक्षण मिळाले. ज्यामध्ये भाषांचे ज्ञान, युद्धकला, राज्यानिती अर्थनीती, व्यवहार,या सर्वांचा समावेश होतो. त्यामुळेच केवळ आठ वर्षांचे संभाजी राजे मराठी, संस्कृत,पारशी,हिंदी,इंग्रजी, पोर्तुगीज, कन्नड, तेलगू,या भाषा बोलू,लिहू व वाचू शकत होते. विशेषतः संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अत्यंत स्वाभिमानी संभाजी महाराज महापराक्रमी व कुशल योद्धा होते. छत्रपती शिवरायांनी त्यांना वयाच्य अवघ्या आठव्या वर्षी वऱ्हाड प्रांताचे राजे केले. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबासोबत सन १६७० मध्ये अत्यंत निकराची लढाई झाली त्यावेळेपासून राज्याभषेका पर्यंत शंभुराजे शत्रूंशी खूप लढले.सन १६७० नंतर छत्रपती शिवाजमहाराजांच्या मार्गदर्शनाने त्यांना १०,०००सैन्याची तुकडी देण्यात आली १६७१ नंतर त्यांना स्वतंत्र कारभार करण्याचे स्वातंत्र्य दिले.सन.१६७२ मध्ये त्यांनी खंबायत,व गुजरातवर आक्रमण केले व अवघ्या पंधराव्या वर्षी ही लढाई जिंकली.सन १६७४ मध्ये तहात गमावलेले २३ किल्ले शंभूराजांच्या नेतृत्वाखाली परत मिळविले.या सुमारे १९ वर्षाच्या कालखंडात शंभूराजांनी दीड हजारावर लढाई जिंकल्या होत्या.त्यांच्या कालखंडात राज्याचा खजिना पूर्ण भरलेला असायचा .शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सवलती छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्या होत्या. रयतेतील सर्व सामान्य माणसावर त्यांचे प्रेम होते.जेव्हा छत्रपती शिवाजी माहराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शंभूराजांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले.सन १६७५ मध्ये आदिलशहावर स्वारी करून गोवालकोंढा , हुबळी,रायाबाग,भागानगर जिकले. दि.३एप्रिल १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.त्यामुळे १६ जानेवारी १६८१ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांचे केवळ ३२ वर्षांचे आयुष्य परंतु ते त्यांनी.शेतकरी,बहुजन समाज, साहित्यिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी वेचले.परंतु त्यांना विरोध करणाऱ्यांनी फितुरीने पकडून दिले.परंतु आपल्या समोर मृत्यु असतानाही ते डगमगले नाहीत. औरंगजेबाने शंभूराजांना अनेक प्रश्न विचारले स्वराज्याचा खजिना, स्वामिनिष्ठ सरदारांची नावे विचारली परांतु मृत्यूला सामोरे जाताना ते अजिबात डगमगले नाहीत. औरंगजबाने त्यांना हाल हाल करून ठार मारले.सर्व प्रथम त्यांची जीभ कापण्यात आली, डोळे काढण्यात आले. कानामध्ये गरम सिसे ओतण्यात आले. अंगावरची कातडी सोलून त्यावर मीठ चोळण्यात आले.अशा प्राणांतिक वेदना सहन केल्या व मृत्यूस सामोरे गेले. त्यांच्या सारखी प्रखर देशभक्ती , धाडसी, पराक्रमी, बुद्धिमान,महान योद्धा झाला नाही. शंभूराजांनी वयाच्या १९ व्या वर्षी बुद्धभूषण, नाईकाभेद, नखशिख आणि सातसतक हे चार ग्रंथ लिहिले.अशा या महान छत्रपतीस मानाचा मुजरा.



1857 चा राष्ट्रीय उठाव

१८५७ चा उठाव
१० मे १८५७ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारविरोधात सैनिकांनी उठाव केला.संपूर्ण भारतात असंतोष पसरला होता.मिरत छावणी मधील मंगल पांडे याने असंतोषाची ठिणगी पेटविली. मिरत वरून सैन्याची तुकडी दिल्लीला गेली.दिल्ली काबीज केली.ही बातमी पंजाबात
पोहोचली .तेथील इंग्रज छावणी ची तुकडी कंपनी सरकारच्या मदतीला धावली , इंग्रजांची आधुनिक शस्रे , युद्ध शास्त्र,एकजूट,शिस्त यामुळे.कंपनी सरकारला क्रांती दडपण्यास यश आले. परंतु या क्रांती मुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात तिच्या विषयी आदर कायम राहिला.या स्वातंत्र्य युद्धात अनेक थोर क्रांतिकारक, सेनानी यांनी नेतृत्व केले होते.हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. ज्यांनी या समरात उडी घेतली त्यांना विनम्र अभिवादन!!!



कृषीवर विश्वनाथ नारायण मंडलिक

कृषीवर विश्वनाथ नारायण मंडलिक स्मृति दिन

विश्वनाथ मंडलिक यांचा जन्म १८३७ मध्ये झाला.ब्रिटिश राज्यकर्त्यांशी परखडपणे वागत कर्तबगारी, निस्पृहता , लोकांचे हित जपणारे त्यामुळे राज्यकर्ते व बहुजन समाजास आदरास पात्र होते. एल्फिन्स्टन इन्स्टिट्युट मधून उच्च शिक्षण प्राप्त केले.ते एक यशस्वी वकील होते.एका मिनिटाच्या उशिराने गाडी चुकली तेव्हा अशिलाचे नुकसान होऊ नये. स्वतः च्या खर्चाने आगगाडी घेऊन मुंबई वरून पुण्याला आले. वकिलामधील ते एकमेव उदाहरण होय. मुंबई म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष मुंबई कौन्सिलचे सभासदत्व त्यांना मिळाले.पुढे व्हाइसरॉयच्या कौन्सिल चे मुंबई प्रांता तर्फे पाहिले हिंदी सभासद म्हणून निवडले गेले . लोकांमध्ये राजकीय करण्यासाठी बॉम्बे असोसएशन ही संस्था व नेटीव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र स्वतः चे खर्चाने झीज सोसून चालविले.त्यांच्या काटेकोर व निःस्पृह वागणुकीमुळे अन्यायाला प्रतिबंध बसत असे.



भारताचे स्थल सेनाप्रमुख प्राणनाथ थापर

भारताचे माजी स्थल सेनाप्रमुख प्राणनाथ थापर हे भारताचे माजी स्थल सेना प्रमुख .होते त्यांचा जन्म 8मे1906 साली झाला.लाहोर येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले.इंग्लंड मध्ये शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाले. सन 1926मध्ये पहिल्या पंजाब रेजिमेंट मध्ये ते कमिशंड अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते.त्यांनी सन 1956मध्ये इंग्लंड मध्ये शहीत संरक्षण महाविद्यालयात अत्युच्य संरक्षण शास्त्राचे शिक्षण घेतले.1957 ते 1961ते दक्षिण भागाचे सेनाप्रमुख होते.1961 ते 1962या काळात ते स्थल सेनाप्रमुख झाले.याच वेळी चीनने भारतावर आक्रमण केले होते.10नोव्हेंबर 1962मध्ये ते निवृत्त झाले.1964मध्ये अफगाणिस्तान मध्ये भारतीय राजदूत होते.दिल्ली पासून जवळच असलेल्या छ त्तर पुर खेड्यात 1975 मध्ये त्यांचे निधन झाले.अशा अभूतपूर्व
स्थल सेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांस विनम्र अभिवादन,!!!



श्री रामजी बाबा उत्सव 2021

पौष पौर्णिमा हा रामजी बा बा यांच्या पुण्य तिथी मुळे उत्सव भर विण्यात येतो या मध्ये गावाचे ग्रामस्थ पाहुणे राऊळे येतांत देवाची तळी भारतात . मनोभावे पूजा करतात पारंगावाचा बंगाड गाडा सुद्धा सहभागी होतो. मुली माहेराला येतात जावई येतांत नातवणडे येतात देवाला पहिल्या दिवशी करेवर घेऊन जातात व त्याला अभिषेक केला जातो आरती होते . पूजा करून देव मंदीरात आणला जातो . तिथे लिंगाची पूजा होते . निमगावचे देवस्थान व जेजूरीचे देवस्थान असे दोन देवस्थान आहेत ,व त्यांची पूजा झाल्यावर संत रामजी बाबांची पूजा होते त्यामध्ये अभिषेक स्नान व आरती केली जाते त्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ सहभागी होतात देवाची करूणा भाकतात महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते . आज पासून जागरणा ला सुरुवात होते प्रत्येक जन आपल्या शक्ती प्रामाआणे जागरण घालतात यावर्षी जाआगाराणाला 200 रु दक्षि णा केली आहे या प्रमाणे चार दिवस कार्यक्रम साजरे केले जातात चतुर्थीला गावातून पालखी ची मीरवाणूक
असते पालखी आल्यावर ईतर कार्यक्रम सादर होतात.



कर्मवीर भाऊराव पाटील karmvir bhaurao patil

कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व समाज सुधारक कोल्हापूर जिल्ह्यातील कुम्भोज या गावात त्यांचा दि.22 सप्टेबर 1887 रोजी जन्म झाला.प्राथमिक शिक्षण कुम्भोजला झाले.इंग्रजी 6 वी पर्यंत इंग्रजी शिक्षण झाले.भाऊ रावांची खेडो पाड्यातील जीवनाची जाणीव होती.कराड माधील काले याठिकाणी त्यानी 1919 मध्ये पहिले वसतीगृह काढले.तेथेच रयत शिक्षण सन्स्थेची स्थापना झाली.सं 1924 मध्ये सर्व बहुजन समाजातील मुलांसाठी वसती गृह काढले.सन 1927 मध्ये म.गांधीनी वसतीगृहाला भेट दिली.कर्म वीरान्चे कौतुक केले.अस्पृश्यांच्या सह सर्व मुलांना पोटच्या मुला प्रमाणे सांभाळले .त्यातले बरेच विद्यार्थी परदेशी शिक्षणाला गेले.शिक्षणा पासून वंचित अशा मुलाना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.रयत शिक्षण संस्थेचे आजन्म कार्यकर्ते घडविले त्यानी संस्थे साठी मोठे योगदान दिले.कर्मवीरांमुळे आपले जीवन घडले म्हणून त्यांनी निस्वार्थीपणे,कृतज्ञपणे कर्मवीरां च्या कार्यास हात भार लावला.म्हणून रयत शिक्षण संस्था जनतेची झाली.वटवृक्ष हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे संस्थेचे बोध वाक्य आहे.महात्मा ज्योतिबा फुले.राजर्षी शाहू यांच्या कार्याला हातभार लावला.सावित्री बाई फुले विद्यापीठा तर्फे त्यांना डी.लिट.ही सन्मान्य पदवी प्रदान केली.1959 मधे भारत सरकारने त्याना पद्मभूषण हा किताब दिला.9 मे 1959 त्यांचे निधन झाले.



संत नामदेव

संत नामदेव आषाढ वद्य 13 या दिवशी भागवत धर्माचा प्रसार करणारे प्रसिद्ध संत नामदेव समाधीस्थ झाले.तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात भागवत भक्तीचा प्रसार झाला त्याचे श्रेय संत नामदेवाना जाते नगर
जिल्ह्यातील नेवासे येथे भावार्थ दिपिका प्रगट झाली.
यातूनच संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यानी तिर्थयात्रा केली.नामदेवानी संपुर्ण भारत भ्रमण केले.भागवत धर्माचा प्रसार संपुर्ण भारतात झाला.संत ज्ञानदेवानी समाधी घेतल्यावर नामदेव उदास झाले.उत्तरेस वारकरी घेऊन गेले.पन्जाब पर्यंत त्यानी विट्ठल भक्ती पोहचवली.हिन्दी भाषेत भजने लिहिली.त्यापैकी काही शिखानच्या ग्रंथ साहेब मध्ये आजही आहेत.पंजाबत घोमान येथे आजही नामदेवान्च्या पादु कांची पूजा होते.बाबा नामदेवायी म्हणून त्याना नाव मिळाले आहे.जुनागडचे नरसी मेहता आणि शिखा पंथाचेप्रवर्तक नानक यानी नामदेवान्च्या भक्तीची वा अभंग वाणिचि प्रशशा केली होती.आजही नामदेवान्चे अनुयायी पन्जाबात आहेत.तेराव्या शतकातील या भागवत भक्ताची केवढी थोरवी आहे.नामदेवांचे पूर्वज यदुशेट शिंपी होते.यांच्यापासुन पाचवा पूरूष दामाशेटि यांच्या बायकोचे नाव गोणाई याच दाम्पत्यास शके 1192 मधे पुत्र रत्न झाले.तेच नामदेव होय.बालपना पासून ते विट्ठल भक्त होते.याच दिवशी संत जनाबाई यानी सुद्धा समाधी घेतली.



हरिपाठ

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥१॥


हरींमुखें म्हणा हरीमुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥


असोनि संसारी जिव्हें वेगू करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा

ज्ञानदेव म्हणे व्यासचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरीं ॥४॥



अनंत कानेकर

अनंत आत्माराम कानेकर यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी झाला.कथा,कविता,लघू निबंध,नात्य,इ .विविध वाड़:मय प्रकारत मोलाची कामगिरी करनारे चतुरास्र लेखक म्हणजे प्रा.अनंत कानेकर होय.त्यांचे शिक्षण मुंबई येथे बी.ए.एल.एल.बी.पर्यंत झाले.नाट्यमंवंतर या नात्य संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.चित्रा या साप्ताहिकाचे ते सम्पादक ही ते होते.निशिकान्ताची नवरी,पतन्गाची दोरी आई.विविध नाटके,चान्दरात,काव्यसंग्रह,धुक्यातून लाल तार्यान्कडे हे प्रवास वर्णन अशी त्यांची अनेक गाजलेली पुस्तके,आहेत.मुंबई च्या सिद्धार्थ महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते.साहित्य अकादमी,संगीत अकादमी आई.साहित्य संगीत क्षेत्रात कार्य करनार्या ते सन्माननीय होत.त्याना सोव्हीयेट देशात र्फे नेहरु पारितोषिक मिळाले.त्यांच्या ज्न्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा



महात्मा ज्योतिबा फ़ुले युग प्रवर्तक कसे

महात्मा ज्योतिबा फ़ुले
२० फ़ेब्रुवारी २८२७ रोजी महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचा जन्म माळी समाजात झाला.ज्योतिबांचे पूर्वज पेशवे दरबारात फुले पोहोचवायचे त्यामुळे त्यांना फ़ुले आडनाव मिळाले.तसे हे कुटुंब पुरंदर तालुक्यातले पण नशीब काढण्यासाठी पुण्यात आले.त्यांच्या वडीलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव होते चिमणाबाई ज्योतिबा ९ ते १० महिन्याचे असतांनाच त्या देवाघरी गेल्या त्यामुळे सगुणाबाई क्षिरसागरने त्यांना सांभाळले.त्यामुळे इंग्रजीचे बाळकडु लहानप्णीच त्यांना मिळाले.भेदाभेदाचे भान नसलेल्या ज्योतिबाला एका ब्राम्हणाच्या लग्नात भान आले.थॊमस पेन त्यांच्या वाचनात आला आणि त्यांची विचार यात्रा सुरू झाली.माणसाचे मन हे त्याचे मंदीर असते ,विद्येविना मती गेली,मती विना नीती गेली,नीती विणा गती गेली,गती विना वित्त गेले,एवढे अनर्थ एका अविद्येने केले..शिक्षण हेच समाज मानस परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे.हे लक्शात येताच अस्पृश्यांसाठी ,स्रीयांसाठी त्यांनी शाळा काढल्या.अनाथाश्रम,काढले,वृत्तपत्र काढले.धर्म जन्माने न मिळता माणसाच्या स्व:तच्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे .विवाह बाह्य अनौरस पुत्र दत्तक घेतला .केशवपन विरुद्ध चळवळ उभारली.सत्यशोधक समाजाची स्थापना केली.गुलामगिरी ,शेतकर्याचा असूड ही पुस्तके लिहीली.शेतकर्यांच्या व्यथा इंग्रज सरकारच्या दरबारी मांदल्या.शेतकरी हा समाजाचा कणा आहे.पोशिंदा आहे.अन्नदाता आहे.असे मत मांडले.चाळीस वर्ष चंदना सारखे झिजले.प्रवास केला.व्याख्याने दिली.लेख लिहीले.स्वातंत्र्य ,समता,लोकशाही.इहवाद या आधूनिक मूल्यांवर्भर देऊन सामजिक क्रांतीची रचना केली.डॊ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले.त्यांच्या विचारांना कृतीची जोड दिली.खर तर शिक्षणाची जी नेत्र दिपक प्रगती झाली आहे ती केवळ ज्योतिबा फ़ुले यांच्यामुळे झाली आहे.१जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पहीली शाळा सुरु केली.त्याम्ध्ये त्यांना सहकार्य केले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फ़ुले यांनी.सावित्री बाई या पहील्या स्री शिक्षिका ज्योतिबांमुळे भारतीयांना विविध क्षेत्रात शिक्षणाची कवाडे उघडली गेली.त्यामुळे आद्य शिक्षणाचे ते जनक होय.



राष्ट्रीय छात्रसेना स्थापना दिन

राष्ट्रीय छा त्र सेना स्थाप ना दिन
भारतातील शालेय ,महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने 25 नोव्हेंबर 1948 या दिवसापासुन राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)ही योजना सुरु केली.नेतृत्व ,चारित्र्य ,बन्धुभाव,खिलाडु वृ त्ती,सेवावृत्ती इत्यादी गुनविशेषा न्चे युवक व र्गाला प्रशिक्षण देणे.राष्ट्रीय आपत्तीकाळा त प्रशिक्षित वा शिस्तबद्ध अशा युवकवर्गाचे सहाय्य मिळवणे ही राष्ट्री य छात्र सेनेची उद्दीष्ट्ये आहेत.देशात छात्र सेनेची एकूण 16 संचालनालये आहेत.सर्व घट क राज्ये व केंद्र शासित प्रदेश त्यांच्या आखत्यारीत येतात.लेफ्ट नंट जनरल या दर्जाचा अधिकारी राष्ट्री य सेनेचा
प्रमुख असतो.तर ब्रि गेड़ीयर किंवा तत्सम दर्जाचा अधिकारी हा सन्चालनालयाचा प्रमुख अ सतो.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्येष्ठ विभाग,शालेय विद्यार्थ्यांना कनिष्ठ विभाग व विद्यार्थीनींचा एक विभाग असे छात्र सेनेचे तीन विभाग आहेत सैनिकी प्रशिक्षणबरोबर छात्रा ंना गिर्यारोहण ,जलपर्यटन,ग्लायडींग इत्यादी प्रकारच्या साहसी कामांचे प्रशिक्षण दिले जाते.रक्तदान,वृक्षा रोपण,प्रौढशिक्षण
संकट ग्रस्तांची सेवा इत्यादी सामाजिक कार्यातही छा त्र भाग घेतात.



चांदखेड येथील जागृत विट्ठल रखूमाई मंदीर

चांदखेड हे एक मावळातील प्रसिद्ध गाव आहे.पुणे शहरापासून सुमारे 25 किमी अंतर आहे.अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य व इतिहास प्रसिद्ध गाव.या मध्ये गावाला खुप मोठा भू भाग लाभला आहे.गावात श्री संत रामजीबाबा व संत रघुनाथ बाबा या सारखे सत्पुरुष यांचे मार्गदर्शन लाभले आहे.गावात अनेक जाती जमातीचे लोक गुण्या गोविन्दाने रहातात.छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतर छत्रपती सयाजीराव गायकवाड़ हे वास्तव्यास असल्याचे स्थानिक लोक सांगतात .
||पाऊले चालती पंढरीचीवाट ||
हे गाणे सकाळीच कानावर पडे प्रल्हाद शिदे यांचे गाणे असायचे.गावात विट्ठल रखमाई मंदीर फार जुने आहे.अगदी लहान असलेल्या मंदिराचा आता जिर्नोद्धार झाला आहे.पूर्वीपासून येथे राम जन्म कृष्ण जन्म साजरा होत असे.या मंदिरात चातुर्मासानिमीत्त प्रवचन असायचे.या प्रवचनाला रामराव गायकवाड़,शिवराम गायकवाड़,पोपट गायकवाड़,होगले आण्णा,गागा तात्या,बबन कलस्कर,शांता राम गायकवाड़,तुकाराम कदम,तुकाराम गुलाबराव गायकवाड़,मारुती सदाशिव गायकवाड़,ज्ञानेश्वर कदम,चंद्रकांत गायकवाड़,बापु साहेब गायकवाड़,लक्ष्मण
शिंदे किसन सुतार विट्ठल थोरवेअशी मातब्बर मन्डळी असायची शान्तिलाल शहा कुशाभाऊ आगळे,कासम भाई यांचे सहकार्य असायचे,मंदिरात कीर्तन व बारस असायची त्याच प्रमाणे काकड आरती असायची आई आम्हा मुलाना भल्या प हाटे उठवू न काकड आरतीला पाठवायची ग्लासात दुध घेऊन जायचो.त्यावेळी मुलीच काकड आरती म्हणायच्या.भजन प्रथा नव्हती.सकाळी खूप छान वाटायचे.गर्दी खूप असायची प्रसार माध्यम नसल्याने लोक मंदिरात आवर्जून यायचेच मंदिरात जागा पुरत नसायची.धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची हे गाणे गणपत गायकवाड़ यांच्या आवाजात असायचे ते जरी आंधळे होते पण स्वर फार छान जुळ वायचे मग आम्ही प्रसादाची रांग करायचो काही काळाने पुढे यामन्दिरात मला चित्रे काढण्याची संधी मिळाली त्यामुळे मंदिराचा चेहरा मोहरा बदलला .परंतू काही
काळाने मंदिराचा जिर्नोद्धार झाल्याने चित्रे नष्ट झाली.मंदिरातील पिढी बदलली माणसे बदलली.नवी पिढी अधिक जोमाने कांम करत आहे संजय बान्दल,दशरथ साकोरे,बाळू साकोरे आदी लोक पुढे हो ऊन सेवा करीत आहे.भजनकरी मंडळामध्ये नवीं पिढी आली आहे.नव्या जोमाने सर्व कार्य क्रम चालू आहेत.आज बुधवार कार्तिक शु||तृतीया मला मंदिरात सेवा करण्याची संधी मिळाली.



दिवाळी प्रकाशाचा सण

दिवाळी सण महाराष्ट्रात सर्वात महत्वाचा सण आहे.दीपावली या शब्दाचा अर्थच मुळी दिव्यांची रांग हा सण समृद्धिचे प्रतिक आहे.याचा अर्थच असा आहे.आकाशतले तारे.पृथ्वीवर आलेत.अशी कल्पना आहे.आश्विन महिन्याचे पहिले तींन दिवस व कार्तिक महिन्याचे पहीले दोन दिवस.शरद ऋतूच्या मध्यभागी असणारा हा सण आहे.काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत मानला जातो.आर्य भारतात आले तेव्हापासून हा सण साजरा केला जात होता.रावणाला थार6 मारल्यानंतर राम याचदिवशी आयोध्येला आले त्यामुळे असंख्य दिव्यानी दिवाळी साजरी करण्यात आली.पणत्या लावल्या जातात.आकाश कंदील लावले जातात.या काळात नातेवाईक एक मेकांना शुभेच्छा देतात.पहिला दिवस धनत्रयोदशीचा मानतात.यादिवशी धनाची पूजा केली जाते.धनवन्तरीची पूजा केली जाते.यादिवशी.आयुर्वेदाची पूजा केली जाते.एका तबकात चांदीची नाणी ठेवून पूजा करतात.शिवाय.धने व गुळाचा नैवेद्य दाखवतात.यादिवशी पूजा केल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते
दुसर्या दिवशी नरक चतुर्दशी व दिवाळी आहे.यादिवशी भगवान श्री कृष्णाने व रुक्मिणीने नरकासुर राक्षदाचा वध केला व 16 हजार राजकन्येची मुक्तता करतो.ही घटना
आश्विन वद्य चतू र्द शी ला घडते.या घटने मुळे या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात.यावर्षी लक्ष्मी पूजन याच दिवशी आलेले आहे.आमावस्या असली तरी तो दिवस शुभ मानतात.
व्यापारी यादिवशी वही पूजन करतात.प्रसाद म्हणून लाह्या वा ब त्तासे वाटतात.फटाके वाजव ता त चौथा दिवस बली प्रतिप्रदेचा असतो.व्यापाराचा प हिला दिवस म्हणून मानतात.हा साडेतीन मुहुर्तापैकी मानतात.भाऊ बीज हा शेवटचा दिवस.यम आपल्या बहीनी ला भा ऊ बीज करतो मानतात.जगात सुद्धा हा सण मानतात.



महान देशभक्त भगतसिंग

हुतात्मा भगतसिंग महान देशभक्त
भारत देश स्वतंत्र झाला यामध्ये बहुसंख्य लोकांनी स्व:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले. स्वत:चे बलिदान दिले.यामध्ये असलेले भगतसिंग यांचा जन्म २८ सफ्टेबर १९०७ मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या बंग या ठिकाणी झाला.देशासाठी हौतात्म्य स्वीकरलेले भगतसिंग साध्या शेतकरी कुटुंबातील होते. भगतसिंगांचे वडील किशनसिंग यांना क्रांतीकारी वाड:मयाचा प्रसार केला म्ह्णून मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती.छोटा भगतसिंग आपल्या काकाबरोबर शेतात गहु पेरणी करण्यासाठी गेला त्यावेळी काकांनी त्याला विचारले की बाळ काय करतो आहेस त्यावर भगतसिंग म्हणाला मी बंदूकीच्या गोळ्या पेरतोय, की त्यामुळे त्यामुळे बंदूकीची झाडे निर्माण होतील आणि त्याला बंदूका येतील त्या बंदूकीच्या सहाय्याने मी गोळ्या झाडून इंग्रजांना परतववून लावीन व देश स्वतंत्र करीन देश प्रेमाची प्रेरणा अगदी लहान वयातच लहानग्या भगतसिंगांना होती घरातील वातावरण सुद्धा क्रांतीकारकांचे होते.
भगतासिंगाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग या गावीच झाले त्या नंतर त्यांनी लाहोरच्या डी.ए.व्ही. व पुढे नॆशनल महाविद्यालयात १९२३ मध्ये बी.ए. झाले.महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी मी आजन्म अविवाहीत रहाणार आहे अशी शपथ घेतली.केवढे हे देशप्रेम १९२५ च्या रात्री त्यांनी लखनौ येथील काकोरी येथील सरकारी खजिना घेऊन जाणारी अगगाडी लुटली दि.३० ऒक्टोबर १९२८ रोजी सयमन कमिशन लाहोर येथे गेले त्या ठिकाणी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने झाली त्यामध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांना जबर मार बसला त्यामध्ये ते आजारी पडून त्यांचा दुर्दवी अंत झाला.याचा सूड घेण्याचे भगत सिंग यांनी ठरवले त्यामध्ये असलेल्या स्कॊट्ला मारण्या ऐवजी सैडर्सला मारले.”डिस्प्युट बील” व “पब्लीक सेफ़्टीबिल” हे दोन अन्यायकारक कायदे सारकारने मंजूर करून घेण्यासाठी केंदीय विधानसभेपूढे आणले असता प्रेक्षागृहात शक्तीशाली हल्ला केला.ब्रिटीश सरकार च्या धिक्काराची पत्रके काढून ब्रिटीश सरकारला हदरऊन सोडले.शेवटी त्यांना पकडून त्यांच्यावर खटले भरले व २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांना फ़ाशी देण्यात आले.शेवट पर्यंत इन्कलाब जिंदाबाद म्हणत फ़ासावर गेले असे होते भगत सिंग मुलांनो आपल्या श्री संत तुकाराम विद्यालयात अशा देशप्रेमी देशभक्तांचे स्मरण करत असतो त्याचे स्मरण आपल्या अंतकरणात कायम ठेवा ! आपल्या देशासाठी केवढा त्याग आहे.शनिवार दि.२८ सप्टेबरला त्यांचा जन्म दिवस आहे म्हणून त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.



हिंदी राष्ट्रभाषा दिन श्री संत तुकाराम विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला

आज विद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला.हिंदी दिवस सॅन 1950 पासून सुरू करण्यात आला सन 1947 भारत स्वतंत्र झाला खंडप्राय असलेला भारत देश विविध भाषांनी नटलेला आहे आपल्या देशाची एक भाषा असणे आवश्यक आहे या हेतूने देवनागरी लिपी असलेल्या हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्यात आली.हिंदी भाषेच्या प्रचारार्थ 14 सप्टेंबर 1950 पासून हिंदी दिवस म्हणून साजरा का जातो.विशेष अभिमानाची बाब म्हणजे जगातील 93 विद्यापिठा मध्ये हिंदी भाषा शिकवली जाते. विद्यालयात आज हिंदी निबंध स्पर्धा घेण्यात आली
सकाळी 8.30 वाजता वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन श्री झावरे बी के ज्येष्ठ अध्यापक श्री विलास गायकवाड श्री वाघ सोमनाथ श्री यादव दीपक यांनी केले विद्यार्थी मनोगत झाले अध्यापाक मनोगत श्री यादव दीपक यांनी व्यक्त केले श्री विलास गायकवाड यांनी श्री हरिवंशराय बच्चन यांची कविता वाचन केले कोशीष करणे वलो की हार नाही होती
विद्यालयाचे मुख्यअध्यापक श्री लाडके एस बी उपमुख्याध्यापक श्री झावरे बी के यांनी व कळमकर ए टी यांनी विद्यार्थी व विद्याआर्थिनींचे अभिनंदन केले.



जागतिक स्वच्छता दिन

श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव पुणे 47
विद्यालयात सकाळी 8.00 वाजता विद्यालयात प्रभात फेरी काढण्यात आली विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता करून विद्यार्थी ग्राम प्रदक्षिणा करण्यास निघाले प्रथम कुंभारवाडा येथे स्वच्छता करण्यात आली त्यानंतर श्री संत तुकाराम मंदिराच्या प्रांगणात स्वच्छ ता करण्यात आली च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला समाजात दिसणारी अस्वछ ता पसरलेली आहे त्यामुळे हवेचे पाण्याचे प्रदूषण
वाढते सर्व त्र आजार पण वाढले आहे लहान मुले व स्त्री या नेहमीच आजारी पडत असतांना दिसतात रस्त्याने आपले गाव स्वच्छ ठेवा आपले शहर स्वच्छ ठेवा
आपले रस्ते स्व च्छ ठेवा आपले अंगण स्व च्छ ठेवा अशा घोषणा देत होते गावाच्या मंदिरा समोर विद्यार्थी आपले स्व च्छते विषयी मनोगत व्यक्त करतात विद्यालया चे ज्येष्ठ शिक्षक श्री गायकवाड विलास ,श्री वाघ सोमनाथ,श्री यादव दीपक सौ वाबळे एस डी सौ गुंड एस ए सौ ससाणे सौ इंगळुनकर यांनी नियोजन केले प्राचार्य श्री लाडके एस बी उपमुख्यध्यापक श्री झावरे बी के शी कळमकर ए टी यांनी मार्गदर्शांन केले अशा रीतीने विद्यालयास्त स्व च्छता दिन साजरा करण्यात आला